निवृत्त केंद्रप्रमुख सरिता मुननकर यांचा मरणोत्तर नेत्रदानाचा संकल्प

‘सिंधुरक्तमित्र प्रतिष्ठान’तर्फे ‘जागतिक दृष्टीदान दिन’ साजरा

सावंतवाडी । प्रतिनिधी : सिंधुरक्तमित्र प्रतिष्ठान सिंधुदुर्ग यांच्या वतीने मंगळवार, १० जून रोजी सावंतवाडी येथील शासकीय विश्रामगृहाच्या सभागृहात ‘जागतिक दृष्टीदान दिन’ उत्साहात साजरा करण्यात आला. संस्थेचे संस्थापक अध्यक्ष प्रकाश तेंडोलकर यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम पार पडला. याप्रसंगी सावंतवाडी-भटवाडी येथील निवृत्त केंद्रप्रमुख श्रीमती सरिता सुरेश मुननकर यांनी मरणोत्तर नेत्रदानाचा संकल्प करत, तसा अर्ज संस्थेकडे सुपूर्द केला.

श्रीमती सरिता मुननकर यांनी वयाच्या १८ व्या वर्षापासून शिक्षिका म्हणून ज्ञानदानाचे कार्य सुरू केले. जिल्हा परिषदेच्या सेवेत त्यांनी तब्बल ४० वर्षे शिक्षक, पदवीधर शिक्षक, अपग्रेड मुख्याध्यापिका ते केंद्रप्रमुख अशा विविध पदांवर काम केले.

या कार्यक्रमाला ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते भाई देऊलकर, सिंधुरक्तमित्र प्रतिष्ठान सिंधुदुर्गचे सावंतवाडी तालुकाध्यक्ष सुनील राऊळ, जिल्हा उपाध्यक्ष महेश राऊळ, सावंतवाडी-दोडामार्ग विभागीय अध्यक्ष संजय पिळणकर, वेंगुर्ला उपाध्यक्ष सौ. समृद्धी संजय पिळणकर, सल्लागार सुधीर पराडकर, कार्याध्यक्ष दीपक तारी, सैनिक पतसंस्थेचे चेअरमन बाबुराव कविटकर, माजी निवृत्त केंद्रप्रमुख श्रीम. सरिता सुरेश मुननकर, ज्येष्ठ पत्रकार उत्तम वाडकर, अभिमन्यू लोंढे, सैनिक स्कूल आंबोलीचे सहाय्यक शिक्षक परमेश्वर सावळे, सिंधुदुर्ग जिल्हा बँकेचे व्यवस्थापक लक्ष्मण आरोसकर, दीनानाथ बांदेकर, प्रल्हाद तावडे, प्रताप परब आदी मान्यवर उपस्थित होते.