राज ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप

कुडाळ l प्रतिनिधी : महाराष्ट्र नवनिर्माण सेना प्रमुख सन्माननीय श्री. राजसाहेब ठाकरे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून महाराष्ट्र नवनिर्माण पर्यावरण सेनेचे राज्य अध्यक्ष श्री. जय शृंगारपुरे यांच्या सौजन्याने आयडीयल इंग्लिश मिडीयम इको स्कूल, नेरूर येथे विद्यार्थ्यांना शालेय उपयोगी साहित्याच्या किटचे वाटप करण्यात आले.

 

या कार्यक्रमात श्री. जय शृंगारपुरे यांचा शाल, श्रीफळ व गुलाबपुष्प देऊन सन्मान करण्यात आला. यावेळी बोलताना त्यांनी, “पर्यावरण संवर्धनाच्या दृष्टीने शाळेत जे जे उपक्रम राबवले जातील, त्यासाठी मी कायमच सहकार्य करीन,” अशी ग्वाही दिली.

 

कार्यक्रमावेळी व्यासपीठावर श्री. हिमांशू शृंगारपुरे, श्री. काका गावडे, शाळेचे प्राचार्य श्री. सौरभ पाटकर, शिक्षक श्री. भूषण सारंग, श्रीमती श्रद्धा गोसावी, श्रीमती आरोही तारी, श्रीमती योगिता म्हाडदळकर, श्रीमती भक्ती फोंडेकर, श्रीमती प्रतिक्षा दळवी, श्री. चैतन्य चव्हाण, श्रीमती करिष्मा खानविलकर, श्रीमती धनश्री मेस्त्री, तसेच शिक्षकेतर कर्मचारी श्री. वैभव आकेरकर, श्री. मिलिंद नाईक, श्रीमती विनया चव्हाण, श्रीमती अपर्णा म्हापणकर उपस्थित होते. विद्यार्थी व पालकांचा मोठ्या प्रमाणात सहभाग होता.

 

कार्यक्रमाचे सुत्रसंचालन सौ. आरोही तारी यांनी केले, तर आभार प्रदर्शन प्राचार्य श्री. सौरभ पाटकर यांनी केले.