शिरगाव (प्रतिनिधी) – देवगड तालुक्यातील साळशी ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी श्री संत सिद्धेश्वर पावणाई ग्रामविकास पॅनलचे पांडुरंग शांताराम मिराशी यांची बिनविरोध निवड झाली आहे.
ग्रामविकास पॅनलच्या ठरलेल्या फॉर्म्युल्यानुसार, अडीच वर्षांच्या कार्यकाळानंतर तत्कालीन उपसरपंच कैलास गावकर यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला. त्यामुळे उपसरपंच पद रिक्त झाले होते. त्या पार्श्वभूमीवर घेण्यात आलेल्या निवडणुकीत पांडुरंग मिराशी यांचा एकमेव अर्ज प्राप्त झाल्याने त्यांची बिनविरोध निवड करण्यात आली.
या वेळी उपस्थिततांनी त्यांना पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन व शुभेच्छा दिल्या.
यावेळी सरपंच वैशाली सुतार, ग्रामपंचायत सदस्य विशाखा साळसकर, कविता साळसकर, आदिती रावले, वैभव साळसकर, पूनम मणचेकर, माजी सरपंच किशोर साळसकर, प्रभाकर साळसकर, साळशी पोलिस पाटील कामिनी नाईक, साळशी ग्रामपंचायत अधिकारी प्रथमेश देशमुख, तसेच ग्रामपंचायत कर्मचारी उपस्थित होते.
निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून चाफेड ग्रामपंचायत अधिकारी हनुमंत तेरसे यांनी काम पाहिले













