Chiplun: भूस्खलन होऊन काढलेला गाळ पुन्हा ‘वाशिष्टी’ त येऊ नये यासाठी महत्वाचा उपाय राबवणार

Important measures will be taken for new ones not to come to ‘Vashishti’ again due to landslides.

चिपळूण : चिपळूण वाशिष्ठी नदीतील गाळ काढण्याचे काम नाम फाउंडेशनचे वतीने गेली दोन वर्षे चालू आहे. नदीतील गाळ काढताना डोंगरातील जमिनीची धूप होऊन भूस्खलन होऊन गाळ पुनश्च नदीत येऊ नये या करिता वाशिष्ठी नदीच्या चिपळूण शहराच्या पूर्वेकडील पाणलोट क्षेत्रात येणार्या ग्रामपंचायती व अन्य स्वेच्छेने सहभागी होणार्या ग्रामपंचायती या पैकी सुमारे २० ते २२ ग्रामपंचायतीचे वृक्ष लागवडीचे प्रस्ताव गटविकास अधिकारी यांचे कडे आलेले आहेत.

व्रुक्ष वल्ली रोपवाटीके कडून ८००० एक दीड वर्षाचे देशी व्रुक्षांची रोपे या मध्ये रायवळ आंवा, फणस, बहावा कांचन. जांभूळ अशी देणेस तयार आहेत. या व्यतिरिक्त नाम ही विविध प्रकारची रोपे देणार आहे. प्रस्ताव दिलेल्या ग्रामपंचायतीच्या जागा, शासकीय जागा, शाळा, देवरहाटी व रस्ते या ठिकाणी नियोजन बद्ध पद्धतीने नाम फाउंडेशन चे वतीने खड्डे मारून देवून आपणास मिळत असलेली रोपे पोहच द्यायची आहेत. ही रोपे देवरुख तांबे यांची नर्सरी पासून ग्रामपंचायती पर्यंत पोहचविणेस आमदार शेखर सर वाहन नाम ला देणार आहेत.

ग्रामपंचायती कडून हमी पत्र घेणार आहोत तसेच वर्षातील तीन महिने त्या गावातील बैठकीचे लोक पाणी घालण्यासाठी मदत करतात का? ते पाहणे आहे. या मध्ये नाम JCB देऊन नियोजनबध्द पद्धतीने खड्डे मारले जातात का हे पाहणे व रोपे व्यवस्थित पोहचविणे लागवड होते का नाही व कशी होते? याचे आपण सर्वांनी सामाजिक भावनेतून देखरेख करणे अशी योजना आहे. तसेच नाम चे वरिष्ठांनी मान्यता दिलेस एक मोबाईल अॅप तयार करणे, जो खड्डा मारू त्याला जिओ टॅग करणे व कोड नंबर देणे. त्या खड्ड्यात झाड लावताना त्याचा टॅग व कोड नंबर दिल्यावर त्या ठिकाणी अॅप वापरणारा असामी त्या वेळचा फोटो अपलोड करु शकेल तसेच कोड नंबर वरुन अॅप वापरणारणार्याला नजिकच्या काळात अपलोड केलेली माहिती मिळू शकेल. अश्या प्रकारचा प्रस्ताव /प्रकल्प आहे, अशी माहिती या चळवळीतील प्रमुख कार्यकर्ते शहानवाज शाह यांनी दिली.

नाम फाउंडेशन वरिष्ठांनी मान्यता दिलेस आपल्या सर्वांना कंबर कसून हे काम करायचे आहे व मला विश्वास आहे की वरिष्ठांनी मान्यता दिलेस आपण हा प्रकल्प जबाबदारीने नियोजन.बद्ध रितीने पूर्णात्वास नेऊ “नाम” संपूर्ण साथ देणार आहे.