देवरुख : विनापरवाना कत्तलीच्या उद्देशाने दोन बैलांना अमानवीय पद्धतीने बांधून नेणारे बोलेरो पिकअप पकडून त्याचा चालकासह याला प्रवृत्त करणाऱ्या दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई देवरुख येथील मूर्शि चेकपोस्ट येथे करण्यात आली.
रत्नागिरी जिल्ह्यामध्ये गोवंश वाहतूक व कत्तल यांच्याविरोधात नूतन जिल्हा पोलीस अधीक्षक, नितीन दत्तात्रय बगाटे व अपर पोलीस अधीक्षक श्रीमती. जयश्री गायकवाड यांनी आक्रमक भूमिका घेतली असून सध्या कडक तपासणी सुरू आहे. या पार्श्वभूमीवर
शुक्रवारी दि. 13/06/2025 रोजी rati 8.35 वाजण्याच्या दरम्यान देवरुख पोलीस ठाणे हद्दी मधील साखरपा पोलीस दूर क्षेत्र अंतर्गत मूर्शि चेकपोस्ट येथे नियमित गस्ती दरम्यान एक संशयित बोलेरो पिकप वाहन क्र. MH-08-M-4929 येत असल्याची दिसून आले. त्याला देवरुख पोलीस पथकामार्फत थांबविण्यात आले व बोलेरो पिकप हौद्याची अधिक तपासणी केली असता त्यामध्ये दोन बैल जवळजवळ बांधलेले दिसून आले.
या वाहनावरील चलकाची तसेच इतर इसमांची अधिक चौकशी केली असता संशयित सागर नामदेव पाटील याने आपल्या ताब्यातील बोलेरो पिकपमध्ये दोन गोवंश जनावरे वाहनात हालचाल करता येणार नाही व त्यांना वेदना होतील अशा प्रकारे आखूड दोरीने मानेला बांधून गाडीचा हौदा चारही बाजूने ताडपत्रीने बंदिस्त करुन अवैध पद्धतीने वाहतूक करत असल्याचे निष्पन्न झाले. त्यामुळे चालकसह सध्या गाडीचा वापर करणारा प्रदीप अरुण लाटवडेकर रा. पिशवी ता. शाहूवाडी जि. कोल्हापूर व बैल मालक आरोपी नागेश कदम रा. देवरुख बौद्ध वाडी यांच्या सांगण्यावरुन ही दोन्ही गुरे कत्तल करण्यासाठी गैर कायदा बिगर परवाना अवैधपणे वाहतूक करून साखरपा पोलीस दूरक्षेत्र अंतर्गत मूर्थि चेकपोस्ट येथून घेऊन जात असल्याचे निष्पन्न झाले म्हणून त्यांच्यावर देवरुख पोलीस ठाणे येथे गुन्हा. रजिस्टर नंबर 66/2025 महाराष्ट्र प्राणी संरक्षण अधिनियम 1976 चे कलम 5, 5 (अ), 5 (ब) व 9 सह प्राण्यांचे छळ प्रतिबंधक अधिनियम 1960 चे कलम 11 (1), (घ), (ङ), (च) सह महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 चे कलम 119 सह मोटार वाहन कायदा 1988 चे कलम 66/192, 3/181 प्राण्यांची वाहतूक नियम 1978 चे कलम 47,48,49,50,51,54,56 भा. न्या. सं 2023 चे कलम 3 (5) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.
या गुन्ह्यामध्ये ₹ 3,50,000/- किमतीची एक सफेद रंगाची महिद्रा बोलेरो पिकअप गाडी, 2) ₹13,000/- किमतीचा एक बैल 3) ₹10,000/- किमतीचा एक बैल असा मिळून 3,73,000/- किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे तसेच गोवंश बैलांची सुटका करण्यात आलेली आहे.
ही, कामगिरी उपविभागीय पोलीस अधिकारी, लांजा श्री. यशवंत केडगे यांचे मार्गदर्शनाखाली देवरुख पोलीस ठाण्याचे प्रभारी पोलीस निरीक्षक श्री. महेश तोरसकर व खालील नमूद पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी केलेली आहे.
1) पो.उ.नि. श्री. नामदेव जाधव, देवरुख पो. ठाणे,
2) पो. हवा/1027 श्री. नितीन जाधव, देवरुख पो. ठाणे,
3) पो. हवा/1551 श्री. संजय करांडे, देवरुख पो. ठाणे,
4) पो. कॉ/1607 श्री. सुहास लाड, देवरुख पो. ठाणे,
5) पो. कॉ/556 श्री. तानाजी पाटील, देवरुख पो. ठाणे,
6) पो. कॉ/1359 श्री. तुळसणकर, पोलीस मुख्यालय रत्नागिरी.













