एडीप व वयोश्री योजनेंतर्गत लाभार्थ्यांसाठी साहित्य वाटप शिबीर

रत्नागिरी l प्रतिनिधी :खासदार नारायण राणे व खासदार सुनील तटकरे यांच्या प्रेरणेतून सामाजिक न्याय, अधिकारिता व दिव्यांगजन सशक्तीकरण विभाग भारत सरकार, पालकमंत्री डॉ. उदय सामंत यांच्या मार्गदर्शनाखाली, भारतीय कृत्रिम अंग निर्माण निगम व समाज कल्याण विभाग जिल्हा परिषद रत्नागिरी व जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्र रत्नागिरी यांच्या संयुक्त विद्यमाने एडीप व वयोश्री या भारत सरकारच्या योजने अंतर्गत दिव्यांग व ज्येष्ठ नागरीकांना मोफत साहित्य वाटपाकरिता तपासणी शिबिरांचे आयोजन दि. 24/02/2025 ते 06/03/2025 या कालावधीत करण्यात आले होते. सदर तपासणी शिबिरात पात्र ठरलेल्या दिव्यांग तसेच 60 वर्षावरील जेष्ठ नागरिकांना खालील वेळापत्रकानुसार होणाऱ्या शिबिरात साहित्य वितरण होणार आहे. सदर लाभार्थींनी साहित्य स्वीकारण्यासाठी येताना तपासणी दरम्यान त्यांना मिळालेली पावती व आपले आधारकार्ड सोबत आणणे अनिवार्य आहे.

या वितरण शिबिरांचे उद्घाटन पालकमंत्री डॉ. उदय सामंत यांच्या शुभ हस्ते दि. 16/06/2025 रोजी 11:00 वा. डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, कुवारबाव, ता. रत्नागिरी येथे संपन्न होणार असून रत्नागिरी तालुक्यातील पात्र दिव्यांग व ज्येष्ठ नागरिकांनी आपले साहित्य स्वीकारण्यासाठी 10:00 ते 04:00 या वेळेत उपस्थित राहावे. असे जिल्हा प्रशासनाच्या वतीने कळविण्यात येत आहे.

जिल्ह्यातील वितरण शिबिरांचे वेळापत्रक तालुका निहाय खालील प्रमाणे राहील.

अ.क्र. तालुका वितरण दिनांक/वेळ योजना स्थळ

1. रत्नागिरी 16/06/2025

10:00 ते 04:00 एडीप, वयोश्री डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन.कुवारबाव,रत्नागिरी

2. राजापूर 17/06/2025

10:00 ते 04:00 एडीप, वयोश्री आबासाहेब मराठे कॉलेज हातीवले राजापूर.

3. लांजा 18/06/2025

10:00 ते 04:00 एडीप, वयोश्री न्यू इंग्लिश स्कूल, लांजा.

4. संगमेश्वर 19/06/2025

10:00 ते 04:00 एडीप, वयोश्री छत्रपती संभाजी महाराज सभागृह पंचायत समिती , देवरुख.

5. चिपळूण 20/06 /2025

10:00 ते 04:00 एडीप, वयोश्री ग्रामीण रुग्णालय कामथे, चिपळूण.

6. गुहागर 21/06/2025

10:00 ते 04:00 एडीप, वयोश्री पंचायत समिती ,गुहागर

7. दापोली 23/06/2025

10:00 ते 04:00 एडीप, वयोश्री छत्रपती शिवाजी महाराज सभागृह ,पं.समिती दापोली

8. मंडणगड 24/06/2025

10:00 ते 04:00 एडीप, वयोश्री डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्मारक सभागृह ,मंडणगड

9. खेड 25/06/2025

10:00 ते 04:00 एडीप, वयोश्री सभापती निवासस्थान पं.समिती खेड