दुचाकी आणि तीन मोबाईल घेऊन झाला पसार
रत्नागिरी ः प्रतिनिधी
तालुक्यातील गोळप येथील कामगाराने दुचाकी आणि तीन मोबाईल असा एकूण 46 हजारांचा मुद्देमाल लांबवला. ही घटना शुक्रवार 13 जून रोजी रात्री 11 ते शनिवार 14 ज्ाून रोजी सकाळी 7 वा. कालावधीत घडली आहे.
शाहिनूर मंडळ (मुळ रा.कोपा,ता.पैकुर बिरभूम पश्चिम बंगाल) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संशयिताचे नाव आहे. त्याच्या विरोधात मोतीराम बासू राठोड (मुळ रा.विजयपूरा,कर्नाटक सध्या रा.पावस,रत्नागिरी) यांनी पूर्णगड पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यानुसार, यातील संशयित कामगार हा फिर्यादींकडे सेंट्रिंगच्या कामाला होता. या कालावधित त्याने अॅक्टीव्हा दुचाकी आणि कामावरील इतर कामगारांचे तीन मोबाईल चोरुन धूम ठोकली. याप्रकरणी संशयित कामगाराविरोधात पूर्णगड पोलिस ठाण्यात भारतीय न्यायसंहिता अधिनियम 2023 चे कलम 306 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.











