शिंदे गटाच्या युवासेने’च्या करवीर विधानसभा मतदारसंघ संपर्कप्रमुख पदी श्रेयस पाटील यांची निवड…

प्रतिनिधी/ रोहन कांबळे

कोल्हापूर: युवासेना (शिंदे गट) करवीर विधानसभा मतदारसंघ संपर्कप्रमुख पदी श्रेयस पाटील यांची नुकतीच निवड करण्यात आली. शिवसेना मुख्य नेते, महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशानुसार, खासदार डॉ.श्रीकांत शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि युवासेना कार्याध्यक्ष पुर्वेश सरनाईक यांच्या अध्यक्षतेखाली नुकतीच ठाणे येथे एक महत्त्वपूर्ण बैठक संपन्न झाली. या वेळी आगामी काळातील S.I.R. प्रक्रिया, मतदार यादी प्रक्रिया सुरळीत व प्रभावीपणे पार पाडणे.तसेच युवासेना सदस्य नोंदणी अभियान अधिक गतिमान करणे, युवा संघटन अधिक मजबूत करण्यासाठी करवीर विधानसभा संपर्कप्रमुख पदी श्रेयस विष्णू पाटील (खुपीरेकर) यांची नियुक्ती करण्यात आली. यासाठी करवीर विधानसभा मतदार संघाचे आमदार चंद्रदीप नरके, युवासेना निरीक्षक विरेंद्र मंडलिक, उपजिल्हाप्रमुख संजय पाटील यांचे विशेष मार्गदर्शन लाभले. श्रेयस पाटील यांचा मोठा मित्रपरिवार असून तरुणांवर मजबूत पकड आहे.पाटील हे सातत्याने सर्वांच्या संपर्कात असतात. त्याचबरोबर गेले १० वर्ष सामाजिक कार्यात, सर्व निवडणुक प्रक्रियांमध्ये व जनआंदोलनात सक्रिय सहभागी असतात. यामुळेच पक्षाने त्यांना मोठी जबाबदारी दिली आहे. या निवडीमुळे त्यांचे सर्व क्षेत्रातून अभिनंदन होत आहे. येणाऱ्या काळात आमदार नरके यांच्या मार्गदर्शनाखाली करवीर विधानसभा मतदारसंघात युवासेनेच्या युवासैनिकांची मोठी फौज तयार करणार असल्याचे पाटील यांनी सांगितले. यावेळी शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.युवासेनेचे सचिव किरण साळी यांनी नवनियुक्त पदाधिकाऱ्यांना शुभेच्छा दिल्या.