राजापूर (वार्ताहर): प्रसिध्द बालसाहित्यिक डॉ. सुरेश सावंत यांना बालसाहित्याचा यावर्षीचा साहित्य अकादमी पुरस्कार जाहीर झाला आहे. त्यांच्या ‘आभाळमाया’ या पुस्तकाला हा पुरस्कार जाहीर झाला आहे.
मुळचे राजापूरचे असलेले कुणाल मदन हजेरी यांनी त्यांच्या चेतक बुक्स’ या प्रकाशन संस्थेमार्फत हे पुस्तक प्रसिद्ध केले आहे, त्यांच्या प्रकाशनाला मिळणारा हा पहिलाच देशपातळीवरील पुरस्कार आहे.
डॉ. सावंत यांची आजवर ५६ पुस्तके प्रकाशित झाली असून त्यापैकी ३३ पुस्तके बालसाहित्याची आहेत. या आधी त्यांना महाराष्ट्र शासनाचे तीन पुरस्कार मिळाले आहेत. वाचनसंस्कृती, लेखनसंस्कृती, बालसाहित्य आणि बालशिक्षणाचा अनुबंध, बाल साहित्यातील नवे काही ही त्यांची उत्तम पुस्तके आहेत. ते नांदेड येथे राहत असून ‘नंदन’ या मासिकाच्या संपादनाची घुराही सांभाळत आहेत.












