ओटवणे 21 जून रोजी संयुक्त द. नाट्य प्रयोग “महायोद्धा इरावत”

ओटवणे (प्रतिनिधी ) आतुरता ग्रुप ओटवणे पुरस्कृत नामवंत दशावतार कलावंतांच्या संचात येत्या शनिवारी 21 जून रोजी “महायोद्धा इरावत ” हा दशावतार नाट्य प्रयोग सातेरी रवळनाथ मंदिर येथे सादर होणार आहे.अक्षय मेस्त्री, दत्तप्रसाद शेणई, सागर गावकर,गोट्या एरागी, सुयश ठाकूर, महेंद्र कुडव, प्रशांत मयेकर,केशव खांबल, निळकंठ सावंत,उदय मोर्ये, गौरव शिर्के,भाऊ मेस्त्री, रोहित नाईक या नामवंत कलाकारांच्या विषेश भूमिका असणार असून बाबल गावकर, संकेत कुडव,श्रीराज मोरजकर, शंकर गावकर, बाबाजी गावकर यांची संगीत साथ लाभणार आहे. आतुरता ग्रुप गावठण वाडी आयोजित या संयुक्त नाट्य प्रयोगाचा लाभ नाट्य रसिकानी घ्यावा असे आवाहन ग्रुप कडून करण्यात आले आहे.