राजापूर (वार्ताहर): येथिल राजापूर महिला नागरी सहकारी पतसंस्था यावर्षी रौप्यमहोत्सवी वर्षात पदार्पण करत आहे. याचे औचित्य साधून शनिवार, दि. २१ जून रोजी सकाळी ठीक ९.०० वाजता पतसंस्थेच्या वतीने नगर वाचनालय, राजापूर येथे रौप्यमहोत्सवी वर्ष उद्घाटन सोहळा व आंतरराष्ट्रीय योग दिन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
यावेळी प्रमुख अतिथी व योगाचे प्रशिक्षण देण्यासाठी प्रशिक्षिका म्हणून श्रीमती रमाताई जोग, रत्नागिरी उपस्थित राहणार आहेत. तसेच, संस्थेच्या अध्यक्षा सौ. श्रुती ताम्हनकर यांचीही प्रमुख उपस्थिती लाभणार आहे.
महिलांनी पुढाकार घेवून महिलांसाठी सुरू केलेली ही पतसंस्था रौप्य महोप्सवी वर्षात पदार्पण करत असताना पतसंस्थेने यशस्वी वाटचाल केली आहे. रौप्य महोत्सवी वर्षात पतसंस्थेच्या वतीने विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. या उपक्रमांची सुरूवात जागतिक योगदिनाचे औचित्य साधुन होत आहे.
यावेळी सर्व सभासद हितचिंतक यांनी उपस्थीत रहावे असे आवाहन उपाध्यक्षा सौ. श्रद्धा धालवलकर, सचिव सौ. प्रेरणा अमरे संचालक मंडळ व कर्मचारीवृंदातर्फे करण्यात आले आहे.













