एस एस पी एम अभियांत्रिकी महाविद्यालयातील विद्यार्थ्याची जेमसन्स पीएचएन टेक्नॉलॉजी प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीमध्ये नोकरीसाठी निवड

एस एस पी एम कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग कणकवली या महाविद्यालयात अंतिम वर्षात शिकत असलेल्या विनय कदम, अविष्कार कांबळे, वैष्णव कुबडे व प्रथमेश नार्वेकर या विद्यार्थ्यांची पीएचएन टेक्नॉलॉजी प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीमध्ये नोकरीसाठी निवड झालेली आहे. टेक्निकल एज्युकेटर व व ऑपरेशनल एक्झिक्यूटिव्ह या पदावर काम करण्याची संधी व वार्षिक 5.6 लाख पगाराची ऑफर कंपनी मार्फत विद्यार्थ्यांना देण्यात आलेली आहे. एस एस पी एम कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग कणकवली व पीएचएन टेक्नॉलॉजी पी प्रायव्हेट लिमिटेड यांच्या संयुक्त विद्यमाने हा प्लेसमेंट ड्राईव्ह आयोजित करण्यात आला होता .

सदरच्या निवड प्रक्रियेत यश संपादन केलेल्या विद्यार्थ्याचे संस्थेचे संस्थापक खासदार माननीय श्री नारायणराव राणे , अध्यक्षा सौ. निलमताई राणे, उपाध्यक्ष निलेश राणे, सचिव नितेश राणे, प्राचार्य डॉ. डी. एस. बाडकर व सर्व विभाग प्रमुख, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले आहे. भविष्यातही एस एस पी एम कॉलेज ऑफ इंजीनियरिंग कणकवलीच्या विद्यार्थ्यांना अशा संधी उपलब्ध करून देण्याची ग्वाही कंपनीच्या वतीने देण्यात आली आहे.