दापोली (प्रतिनिधी): महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष, मराठी हृदयसम्राट मा. राजसाहेब ठाकरे यांनी महाराष्ट्रातील शाळांवर तिसरी भाषा म्हणून हिंदी सक्तीची अंमलबजावणी केल्यास ती खपवून घेतली जाणार नाही, असा स्पष्ट इशारा दिला आहे. या पार्श्वभूमीवर मनसेचे आदेश साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली दापोलीत आंदोलनात्मक पवित्रा घेतला गेला.

दापोलीतील विविध शाळांमध्ये मनसे व मनविसे (महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना) पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी भेट देत मुख्याध्यापक व गट शिक्षकांना राजसाहेब ठाकरे यांच्या आदेशाचे निवेदन सन्मानपूर्वक दिले. यावेळी शाळा व्यवस्थापनाला मराठी भाषेचे स्थान अबाधित ठेवण्याचे आवाहन करण्यात आले.
मनसेने असा ठाम पवित्रा घेतला असून, मराठी भाषेच्या अस्मितेच्या बाबतीत कोणतीही तडजोड केली जाणार नाही, असे मनसे पदाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.
या वेळी उपस्थित असलेल्या मनसे व मनविसेच्या कार्यकर्त्यांनी “मराठीचा अभिमान ठेवा — मराठी शाळा वाचवा!” अशा घोषणांनी परिसर दणाणून सोडला.
शाळांतील शिक्षक व मुख्याध्यापकांनी देखील मनसेच्या निवेदनाची नोंद घेतली आणि हा विषय शासनस्तरावर पोहचवण्याचे आश्वासन दिले.













