रत्नागिरी:
रत्नागिरीमध्ये विशेष पोलीस महानिरीक्षक, कोंकण परिक्षेत्र संजय दराडे यांच्या प्रमुख उपस्थितित, जागतिक योग दिन निमित्त, योग अभ्यास व योग प्रात्यक्षिके” कार्यक्रम संपन्न झाला.

दिनांक 20 जून 2025 रोजी कोंकण परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक मा. श्री. संजय दराडे यांनी रत्नागिरी जिल्ह्यास भेट दिली. या भेटी दरम्यान त्यांनी पोलीस अधीक्षक कार्यालय येथे सर्व पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी यांची “गुन्हे आढावा बैठक” घेऊन त्यांना योग्य सूचना व मार्गदर्शन केले.
“जागतिक योग दिन” निमित्त दि. 21 जून 2025 रोजी, रत्नागिरी पोलीस दलामार्फत उद्यम नगर, रत्नागिरी येथील नाईक हॉल येथे, श्री. दराडे यांच्या प्रमुख उपस्थितित “योग अभ्यास व योग प्रात्यक्षिके” कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.
या “योग अभ्यास व योग प्रात्यक्षिके” कार्यक्रमाला पोलीस अधीक्षक नितीन दत्तात्रय बगाटे, अपर पोलीस अधीक्षक जयश्री गायकवाड, वरिष्ठ पोलीस अधिकारी / अंमलदार उपस्थित होते तसेच सर्व उपस्थितांना योगशिक्षक कीर्तीकुमार औरंगाबादकर, वीरु स्वामी, पतंजली निरामय योग संस्था, रत्नागिरी व या संस्थेमधील 35 सहकारी यांचे मार्गदर्शनाखाली योग व प्राणायाम बाबत प्रात्यक्षिके दाखवण्यात आली.
या आंतरराष्ट्रीय योग दिनी श्री. दराडे यांनी सर्व उपस्थित पोलीस अधिकारी व अंमलदार यांना योगाला केवळ एक सराव म्हणून नव्हे तर जीवनाचा एक मार्ग म्हणून स्वीकारण्यासाठी दररोज फक्त 20-30 मिनिटे योगासाठी समर्पित करण्यास सांगीतले तसेच एक निरोगी व तणाव मुक्त आयुष्य जगण्याबाबत मार्गदर्शन केले.
या “योग अभ्यास व योग प्रात्यक्षिके” कार्यक्रमाला विद्यार्थी, नागरिक व रत्नागिरी पोलीस दलातील अधिकारी व अंमलदार असे 300 जणांनी सहभाग घेतला.
कार्यक्रमाच्या शेवटी परि. पोलीस उपअधीक्षक शिवप्रसाद पारवे, यांनी सर्वांचे आभार व्यक्त केले.











