खेड (प्रतिनिधी) तालुका मराठा सेवा संघाचे संस्थापक अध्यक्ष केशवराव भोसले यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या अध्यक्षपदी त्यांच्या पत्नी आशा भोसले यांची नियुक्ती करण्यात आली. तसेच युवा आघाडी अध्यक्षपदी प्रवीण शिंदे यांची निवड करण्यात आली.
प्रास्ताविक संघाचे सरचिटणीस विश्वासराव शिंदे यांनी केले. कोकण विकास समिती संस्थापक अध्यक्ष जयवंत दरेकर यांच्याहस्ते नूतन पदाधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला. महिला आघाडीअध्यक्षा ज्योती भोसले यांची दादर येथील सुश्रूषा रूग्णालयात संचालकपदी निवड झाल्याबद्दल त्यांचाही सन्मान करण्यात आला. सरचिटणीस यशवंत भोसले यांनी सूत्रसंचालन केले.











