खेड(प्रतिनिधी) शहरातील राजवैभव नागरी सहकारी संस्थेच्या १८व्या वर्धापन नानिमित्त पतसंस्था अध्यक्ष तथा सेचे राज्य सरचिटणीस वैभव डेकर यांच्याहस्ते गरजू विद्यार्थ्यांना शालेय साहित्यांचे वितरण करण्यात आले.
येथील एल. पी. इंग्लिश स्कूलमध्येशिक्षण घेणाऱ्या भोस्ते येथील प्रांजली रवींद्र भंडारी या विद्यार्थिनीला पूरक प्रमाणात शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले. याप्रसंगी पतसंस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी वसंत पिंपळकर, शाखा व्यवस्थापक स्पप्निल नरळकर, मनसेचे जिल्हा उपाध्यक्ष संजय आखाडे यांच्यासह पदाधिकारी व पतसंस्थेचे कर्मचारी उपस्थित होते.












