हातखंबा बोंबलेवाडी शाळेत मुलांना स्कुल बॅग वितरीत

रत्नागिरी :

रत्नागिरी तालुक्यातील जि.प.शाळा हातखंबा बोंबलेवाडी या शाळेत शैक्षणिक वर्षानिमित्त शाळेतील सर्व मुलांना क्रुपासिंधु स्वामी समर्थ मंडळ, मुंबई यांच्या सौजन्याने स्कुल बॅगांचे वितरण करण्यात आले. यावेळी सर्व मुलांना मोफत पाठय़पुस्तके व गणवेश वाटपही करण्यात आले. तसेच शाळेतील पहिले पाऊल हा उपक्रम घेण्यात आला.
शाळेतील विद्यार्थ्यांना स्कुल बॅग वितरण होणेसाठी श्रीकांत बोंबले यांचे विशेष सहकार्य लाभले. शाळेच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमाप्रसंगी हातखंबा गावच्या माजी सरपंच व विद्यमान सदस्या सौ.विद्याताई बोंबले शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष नंदकुमार चंदरकर सर्व सदस्य यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम संपन्न झाला. या कार्यक्रमाप्रसंगी शशिकांत बोंबले, ‘किरण बोंबले, विनायक बोंबले, रिदिमा बोंबले, मयुर बोंबले, सौ.केळकर मँडम तसेच सर्व पालक व ग्रामस्थ उपस्थित होते. शेवटी मुख्याध्यापक आखाडे सर यांनी मुंबई मंडळ बोंबलेवाडी यांचे मुलांना स्कुल बँग वितरीत केल्याबद्दल विशेष आभार व्यक्त केले.