राजापूर भाजपाच्या वतीने उपविभागिय पोलिस अधिकाऱ्यांना निवेदन
राजापूर (वार्ताहर): सोशल मिडीयावर छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल आक्षेपार्ह पोस्ट करणाऱ्या पाचल येथील त्या इसमावर कडक कायदेशीर कारवाई करण्यात यावी अशी मागणी राजापूर तालुका भाजपाच्या वतीने करण्यात आली आहे.
तसे निवेदन गुरूवारी उपविभागीय पोलिस अधिकारी यशवंत केडगे, पोलिस निरिक्षक जनार्दन परबकर यांना राजापूर तालुका भाजपाच्या वतीने देण्यात आले.
यावेळी भाजपा प्रदेश सचिव व माजी आमदार प्रमोद जठार, जिल्हाध्यक्ष अड. दिपक पटवर्धन, भाजपा जिल्हा उपाध्यक्ष रविंद्र नागरेकर, तालुकाध्यक्ष अभिजीत गुरव, अनिलकुमार करंगुटकर, महिला तालुकाध्यक्षा सौ. श्रृती ताम्हनकर, रेणुका गुंडये, सोनल केळकर आदी उपस्थीत होते.
पाचल येथील एका मुस्लिम मुलाने छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल आक्षेपार्ह पोस्ट स्टेटसला ठेवली आहे. सदर घटना आम्ही कधीही खपवून घेणार नाहीत. सदर इसमावर कडक कायदेशीर कारवाई करावी. अन्यथा सर्व हिंदू संघटना मिळून सदर बाबत आंदोलन छेडू असा ईशारा या निवेदनाद्वारे देण्यात आला आहे.
तसेच सदर व्यक्ती भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विषयी आक्षेपार्ह पोस्ट शेअर करीत असतो त्यामुळे त्यांच्यावर कडक कारवाई करावी अशी मागणी करण्यात आली आहे.