आरक्षणाचे जनक,तत्कालीन परिस्थितीत आपल्या संस्थानात प्राथमिक शिक्षण सक्तीचे करणारे, समता प्रस्थापित करताना महिलांसाठी कार्य करणारे, आंतरजातीय विवाहाला प्रोत्साहन देणारे व तसे कायदे करणारे, एवढ्यावरच न थांबता स्वतःच्या चुलत बहिणीचा विवाह यशवंतराव होळकर या धनगर तरुणाबरोबर जमवून जे कृतीवीर राजे झाले, ज्यांनी बोलणे आणि वागणे यात फरक केला नाही असे राजे म्हणजे राजश्री छत्रपती शाहू महाराज असे गौरव उद्गगार सामाजिक न्याय दिनाच्या कार्यक्रमात प्रमुख वक्ते राजेश कांबळे यांनी काढले.
रत्नागिरी एज्युकेशन सोसायटीच्या सौ. गोदूताई जांभेकर विद्यालय , रत्नागिरी या प्रशालेत आज गुरुवार दिनांक 26/ 6 /2025 रोजी छत्रपती राजश्री शाहू महाराज जयंती सामाजिक न्याय दिन म्हणून साजरी करण्यात आली.
सामाजिक न्याय दिन कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी प्रशालेच्या प्र. मुख्याध्यापिका संजना तारी उपस्थित होत्या तर प्रमुख अतिथी प्रमुख वक्ते राजेश कांबळे उपस्थित होते. प्रमुख वक्ते राजेश कांबळे यांनी आपल्या ओघवत्या शैलीत राजश्री छत्रपती शाहू महाराज यांच्या कार्याचा आढावा घेतला. राजश्री शाहू महाराजांनी सामाजिक परिवर्तन करण्यासाठी प्रयत्न केले असे हे आवर्जून सांगितले.
सामाजिक न्याय दिन कार्यक्रमाला प्रशालेतील शिक्षक , शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिवाजी बोटके यांनी केले तर उपस्थितांचे आभार अनिल सागवेकर यांनी मानले.










