नाटे बंदरावर बोटीचा दोर तुटून नेपाळी खलाशाचा मृत्यू

रत्नागिरी:
​नेपाळ देशाचा रहिवासी असलेला २५ वर्षीय राम लखन चौधरी, जो ऑगस्ट २०२५ पासून नाटे येथील फैरोज हुसेन भाटकर यांच्या बोटीवर खलाशी म्हणून कार्यरत होता, त्याचा ७ नोव्हेंबर २०२५ रोजी दुपारी २.२५ वाजता साखरी नाटे जेट्टीवर झालेल्या अपघातात दुर्दैवी मृत्यू झाला. चौधरी आणि इतर खलाशी जेट्टीवर उभे असताना, बंदरात उभ्या असलेल्या एका बोटीचा दोर (रोप) अचानक तुटला आणि त्याचे टोक राम लखन चौधरी यांच्या तोंडाला व डाव्या बाजूला लागल्याने ते गंभीर जखमी झाले. घटनेनंतर फैरोज हुसेन भाटकर यांनी त्यांना तात्काळ रत्नागिरीतील शासकीय रुग्णालयात दाखल केले, परंतु डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. या घटनेची नोंद नाटे पोलीस ठाणे येथे ९ नोव्हेंबर २०२५ रोजी दुपारी २.४८ वाजता आकस्मिक मृत्यू म्हणून करण्यात आली असून, पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.