खेड (प्रतिनिधी) येथील पोलिसांनी ६० हजार रुपये किंमतीचा गुटखा व टेम्पो असा एकूण ४ लाख ६० हजारांचा ऐवज मंगळवारी पोलिसांनी जप्त केला. याप्रकरणी अटक केलेल्या अविनाश दादासाहेब पारेकर (२१, रा. बेवनूर-सांगली) याला न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने ३ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.
वेरळ रेल्वेस्थानकानजीक खेड पोलीस पथकाने पारेकर याच्या मुसक्या आवळल्या. त्याने गुटखा वाहतुकीसाठी लाकडाचा भुसा भरलेल्या पोत्यांचा वापर केला होता. पोलिसांनी झडती घेतली असता गुटखा सापडला होता. याबाबतचा अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक श्रीकृष्ण येवले करत आहेत.











