खेड (प्रतिनिधी) तालुक्यातील गुणदे\ येथील सरस्वती शिक्षण संकुलात ८० वा स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात पार पडला. सरस्वती शिक्षण संस्था संचलित सदगुरु काडसिद्देश्वर विद्यालय, गुरुकुल विद्या मंदिर गुणदे व अनुदत्त जनसेवा प्रतिष्ठान संचलित मातोश्री अनुसया माई आंब्रे स्मार्ट स्कूल गुणदे या तिन्ही प्रशालेंचे संयुक्तपणे भारतीय स्वातंत्र्य दिनी सरस्वती शिक्षण संस्थेचे सहसचिव तथा शाळा समितीचे अध्यक्ष राजेंद्र आंब्रे यांच्या हस्ते प्रशालेच्या प्रांगणात ध्वजारोहण झाले.
सुरुवातीला राष्ट्रीयगीत वंदे मातरम गीतानंतर ध्वजारोहन करण्यात आले व राष्ट्रध्वजाला सलामी देण्यात आली व राष्ट्रगीत, राज्य गीत आणि ध्वजगीत गायले गेले. यावेळी नशा मुक्त भारत व असाक्षर मुक्त गाव शपथ व कॉपीमुक्त शपथ घेण्यात आली. तसेच विद्यार्थ्यांनी भारतीय स्वातंत्र्य दिनाचा विजय असो, वंदे मातरम, भारत माता की जय इत्यादी घोषणा देऊन स्वातंत्र्य दिनाचा उत्सव मोठ्या आनंदाने साजरा केला. त्यानंतर ढोल ताशांच्या गजरात प्रभात फेरी काढण्यात आली.
यावेळी जि प प्राथमिक शाळा नंबर १ व गुणदे ग्रामपंचायतमध्ये ध्वजारोहणाचा कार्यक्रम पार पडला. प्रशालेच्या प्रांगणात देशभक्तीपर गीतांच्या धुनवर संगीत कवायत घेण्यात आली. शासनाच्या परिपत्रकानुसार हर घर तिरंगा ‘अभियान अंतर्गत दि. ९ऑगस्ट ते १५ ऑगस्ट या सप्ताहात विविध कार्यक्रम पार पाडण्यात आले. वरील सर्व संस्थांच्या वतीने संयुक्तपणे १३ ऑगस्ट रोजीचे ध्वजारोहण सरस्वती शिक्षण संस्थेचे माजी अध्यक्ष तथा संचालक भास्कर आंब्रे यांच्या हस्ते झाले. तर दि. १४ ऑगस्ट रोजी संचालक संजय आंब्रे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी संस्थेचे संचालक विष्णु आंब्रे, दीपक आंब्रे, राजेंद्र आंब्रे, अनुदत्त जनसेवा प्रतिष्ठानचे सचिव संदेश महामुणकर, अनुदत्तचे सर्वश्री संतोष पाटोळे, सुभाष आंब्रे, निलेश आंब्रे, सागर आंब्रे, कै. अशोक आंब्रे स्मृती वाचनालयाचे उपाध्यक्ष शिवाजी सावंत, संचालक संतोष म. आंब्रे, गुणदे गावचे सरपंच रविंद्र आंब्रे, माजी सरपंच सौ भारती आंब्रे, उपसरपंच सौ. रुणाली आंब्रे, परशुराम कारेते, शांताराम पाटोळे व केंद्रप्रमुख श्री. पाटील, ग्रामपंचायत सदस्य रत्नाकर कारेते, चंद्रकांत आंब्रे, सखाराम आंब्रे तसेच उषा आंब्रे, सौ. संध्या कांदेकर, संदीप आंब्रे, मंगेश कांगणे, तसेच प्रशालेच्या मुख्याध्यापिका सौ. अश्विनी जोशी, सौ. अनिता विचारे, सौ माने, शिक्षकवृंद, शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. सर्व संस्थांचे अध्यक्ष म्हणून विक्रांत आंब्रे तसेच सरस्वती शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष अरविंद आंब्रे व सहकारी संचालक यांनी भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या सर्वांना शुभेच्छा दिल्या. सालाबाद प्रमाणे अनुदत्त जनसेवा प्रतिष्ठानकडून जिलेबी खाऊ वाटप करण्यात आले. मुख्याध्यापिका सौ अश्विनी जोशी यांनी सर्वांचे आभार मानले.












