आचरा–अर्जुन बापर्डेकर :तोंडवळी येथील श्री देव वाघेश्वर मंदिर तोंडवळी येथे मंगळवार ४नोव्हेंबर रोजी त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.या निमित्त सकाळी सात वाजता ओटी भरणे कार्यक्रमाला सुरुवात.सकाळी १०.३० वाजता विनय वझे आणि सहकारी यांचा भावगीत भक्तीगीत गायनाचा कार्यक्रम.दुपारी महाप्रसाद, सायंकाळी ६.३०वाजता हळदीकुंकू समारंभ, सायंकाळी सात वाजता स्थानिकांची भजने,वाघेश्वर प्रा भजन मंडळ बावकरवाडी, ८वाजता महाप्रसाद,
रात्री ९वाजता वाघेश्वर प्रा भजन मंडळ, रात्री १०वाजता ब्राह्मण देव प्रा.भजन मंडळ सापळे बाग यांची भजने होणार आहेत.११.३०वाजता पोथीवाचन, रात्री १२वाजता दिपोत्सव , रात्री १२.१५वाजता आरती आदी कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत.तरी भाविकांनी लाभ घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.










