एसटी कर्मचाऱ्यांच्या जेवणाची व्यवस्था स्वखर्चाने करणार – प्रताप सरनाईक
मंत्री सरनाईक म्हणाले, गेली कित्येक वर्ष विठुरायाच्या भक्तांची सेवा एसटी व एसटीचे कर्मचारी सातत्याने करत आहेत. ऊन, वारा पाऊस याची तमा न बळगता अतिशय निष्ठेने त्यांचे कर्तव्य ते बजावत असतात. आषाढी वारीच्या काळात त्यांच्या जेवणाची आबाळ होऊ नये, म्हणून यंदा स्वखर्चाने मी सलग तीन दिवस या सर्वांच्या चहा, नाश्ता व जेवणाची व्यवस्था (एकादशीला उपवासाचे पदार्थ) करीत आहे. या निमित्ताने माणसातील ” विठुराया” ची सेवा करण्याची संधी मला मिळत आहे. अर्थात, हे पुण्य पैशात मोजण्यासारखे नाही. त्यामुळे दरवर्षी अशा प्रकारचा उपक्रम मी राबवणार आहे. असे प्रतिपादन मंत्री सरनाईक यांनी यावेळी केले.
आषाढी वारीच्या काळात ५,६ व ७ जुलै रोजी चंद्रभागा बसस्थानक, भिमा बसस्थानक, विठ्ठल बसस्थानक व पांडुरंग बसस्थानक येथे सुमारे १३ हजार एसटी कर्मचारी या मोफत भोजन व्यवस्थेचा लाभ घेतील.












