देवेंद्र फडणवीसांसह भाजप व विरोधी पक्षाचे अर्धे अधिक नेते उद्या सावंतवाडीत

निमीत्त प्रथमेश तेलींच्या स्वागत सभारंभाचे; राणे, तावडे, पाटील, महाडिक, महाजनांची प्रमुख उपस्थिती

सावंतवाडी : भाजपा जिल्हाध्यक्ष राजन तेेली यांचा मुलगा प्रथमेश यांच्या लग्न स्वागत सभारंभाच्या पार्श्वभूमीवर अर्धे अधिक भाजपाच्या नेत्यांसह विरोधी पक्षातील माजी मंत्री, खासदार आणि पदाधिकारी उद्या सावंतवाडीत उपस्थित राहणार आहेत. यात उपमुख्यमंत्री देवेद्र फडणवीस, गिरीश महाजन, सतेज उर्फ बंटी पाटील, धनंजय महाडिक, संजय पाटील आदी नेत्यांचा समावेश आहे.

श्री. तेली यांचा मुलगा श्री. प्रथमेश यांचा विवाह २१ तारखेला गोवा येथे पार पडला. त्याचा स्वागत सभारंभ उद्या २५ नोव्हेंबरला येथील जिमखाना मैदानावर आयोजित करण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर मैदानाला आलिशान स्वरुप आले आहे. त्या ठिकाणी राजवाड्याची प्रतिकृती उभारुन सुशोभिकरण करण्यात आले आहे. तर दुसरीकडे उपस्थित राहणार्‍यांसाठी देखाव्यासह मनोरंजनाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. याबाबतची माहीती श्री.तेली यांच्या मित्र मंडळाकडून व जिल्हा भाजपाच्या पदाधिकाऱ्याकडून देण्यात आली.

ते म्हणाले, उद्या होणार्‍या या कार्यक्रमाची आम्ही जोरदार तयारी केली आहे. वधुवरांना आर्शीवाद देण्यासाठी भाजपासह विरोधी पक्षातील नेत्यांसह मित्रमंडळी उपस्थित राहणार आहेत. यात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांच्यासह केंद्रीय मंत्री नारायण राणे, राष्ट्रीय नेते विनोद तावडे, प्रांताध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, महिला प्रांताध्यक्ष चित्रा वाघ, उद्योगमंत्री उदय सामंत, सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण, माजी मंत्री राम शिंदे, जयकुमार रावल, माजी आमदार राजा राऊत, सांगोल्याचे आमदार शहाजी बापू पाटील, सुनिल तटकरे, बंटी पाटील, शेखर निकम, खासदार संजय पाटील, धनंजय महाडिक, प्रविण दरेकर, गोव्याचे आमदार प्रविण आर्लेकर, जीत आरोलकर, चंद्रकांत शेटये आदी अनेक नेते श्री. तेली यांच्या प्रेमापोटी उपस्थित राहणार आहेत. दरम्यान या स्वागत सभारंभाला उपस्थित राहण्यासाठी जिल्ह्यातील सर्वांना निमंत्रण देण्यात आले आहे. मात्र काही लोकांपर्यत पोहोचणे शक्य झालेले नाही. त्यामुळे त्यांनी सुद्धा उपस्थित राहून वधुवरांना शुभार्शीवाद द्यावेत, असे आवाहनही त्यांनी केले आहे. तर येणार्‍या आमंंत्रितांसाठी पार्किंगची व्यवस्था जिखमाना येथील स्वार हॉस्पिटलच्या समोरील ग्रांउडवर व लाखे वस्तीच्या समोर करण्यात आली असल्याचेही त्यांनी सांगितले.