पाली : वार्ताहर
निपुण भारत अंतर्गत अध्ययन स्तर,वाचन,लेखन,संख्याज्ञान व प्रत्येक इयत्तेच्या अध्ययन स्तरानुसार विद्यार्थी प्रगत होतील यासाठी शिक्षकांनी जास्तीत जास्त प्रयत्न करणे आवश्यक आहे. त्याचबरोबर निपुण महाराष्ट्र कृती आराखड्यामध्ये इयत्ता दुसरी ते पाचवीतील १०० टक्के विद्यार्थी संख्या आवश्यक आहे असे प्रतिपादन खानू केंद्रप्रमुख गोविंद तारवे यांनी केले.
जि. प. सरस्वती विद्या मंदिर खानू क्र.१ येथे खानू केंद्राची केंद्रस्तरीय शिक्षण परिषद संपन्न झाली. यावेळी जिल्हा समन्वयक राहुल मिसाळ, खानू केंद्र मुख्याध्यापिका स्मिता जाधव,शिक्षक मनोजकुमार खानविलकर,दत्तात्रय दर्डी,लवेश गोरे,विजय पर्वते उपस्थित होते. तसेच केंद्राच्या अखत्यारीतील ८ जि.प. शाळा व माध्यमिक विद्यालय यांचे शिक्षक यावेळी उपस्थित होते.
यंदाच्या शैक्षणिक वर्षांमध्ये शिक्षकांना अध्यापनासाठी नवीन उभारी मिळावी तसेच मार्गदर्शन व्हावे त्याचबरोबर शासनाची नवीन धोरणे अवगत व्हावी. तसेच निपुण भारत अंतर्गत शाळांची सद्यस्थिती काय आहे व त्या दृष्टीने कशी तयारी करावयाची आहे.












