सावंतवाडीतील कार : सहाही युवक आश्चर्यकारकरीत्या बचावले
बांदा l प्रतिनिधी : मुंबई गोवा महामार्गावर बांदा बसस्थानक नजीक असलेल्या दुसऱ्या पुलावरून भरधाव वेगात असलेली कार ओहोळातील पाण्यात कोसळून अपघातग्रस्त झाली. हा अपघात रात्री २ वाजण्याच्या सुमारास झाला. कारमधील सहाही युवक आश्चर्यकारकरीत्या बचावले आहेत.
आज सकाळी ही घटना येथील नजीकच असलेले राष्ट्रवादीचे पदाधिकारी प्रशांत पांगम यांच्या निदर्शनास आली. त्यांनी याची माहिती बांदा पोलीस व स्थानिक ग्रामस्थांना दिली. बांदा पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत. कार (एमएच ०७ एजी ०००४) रात्री ओहोळात कोसळली. मात्र पाण्याचा वेग प्रचंड असल्याने व मुसळधार पाऊस सुरु असल्याने अपघात झाल्याचे लक्षात आले नाही. सदर कार सावंतवाडी येथील असल्याची समजते.
पुलापासून १०० मीटर मागे सदर कार डिव्हायडर वर चढली व सुसाट वेगाने स्ट्रीट लाईटचा पोल तोडून पोलवरून सुमारे ६० फूट खोल ओहळात कोसळली. कार मध्ये सावंतवाडी येथील सहा युवक होते. सहाही युवक आश्चर्यकारक रित्या बचावले आहेत.










