खेरशेतमध्ये ‘वर्षावास’ धम्मसंस्कार कार्यक्रमात बुद्ध विचारांचा जागर
रोजगाराभिमुख उपक्रम राबविण्याचा संस्थेचा मानस- विठोबा पवार
संघटन हेच संस्थेच्या यशाचे गमक- चंद्रकांत सावंत
चिपळूण (प्रतिनिधी) : तथागत भगवान गौतम बुद्ध यांचे विचार सबंध मानव जातीला तारणारे असून बुद्ध विचारांचे पालन केल्यास मानवाला जीवनात यशप्राप्ती होईल, असे प्रतिपादन चिपळूण तालुका बौद्धजन हितसंरक्षक समिती सावर्डे विभागाचे अध्यक्ष काशीराम कदम गुरुजी यांनी केले. सावडे विभाग व खेरशेत शाखा यांच्या संयुक्त विद्यमाने खेरशेत येथील तक्षशिला बुद्ध विहारात सावर्डे विभागाचा ‘वर्षावास’ व धम्मसंस्कार सोहोळा रविवारी दि. ४ ऑक्टोबर रोजी मान्यवरांच्या उपस्थितीत धम्ममय वातावरणात साजरा झाला. यावेळी अध्यक्षीय भाषणावेळी आयु. कदम बोलत होते.
संस्थेचे मुंबई मुख्य कमिटी अध्यक्ष विठोबा पवार यांनी यावेळी समाजाचा सर्वांगीण विकास साधण्यासाठी तरुणांना उद्योजक बनवण्याचा संस्थेचा मानस असल्याचे सांगत यासाठी येणाऱ्या काळात संस्था रोजगाराभिमुख विविध उपक्रम राबविणार असल्याचे जाहीर केले. स्थानिक तालुका कमिटी अध्यक्ष चंद्रकांत सावंत यांनी उत्तम संघटनामुळे संस्था प्रगतीपथावर आहे. विविध नाविन्यपूर्ण उपक्रम राबवीत संस्थेने नावलौकिक मिळविला असल्याचे त्यांनी सांगितले. स्थानिक तालुका सरचिटणीस संदेश पवार यांनी यावेळी महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेल्या २२ प्रतिज्ञांचे महत्त्व विशद केले. या प्रतिज्ञांचे पालन केल्यास मानवाचे कल्याण होईल, असे त्यांनी नमूद केले. मिरजोळी दलवाई हायस्कूलचे मुख्याध्यापक रोहित जाधव यांनी महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर लिखित भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म या ग्रंथावर विवेचन करताना आजच्या आधुनिक काळात पंचशील आणि बुद्धांनी दिलेला विज्ञानवादी अष्टांगिक मार्गाचे पालन करणे काळाची गरज असल्याचे सांगितले.
प्रारंभी धम्म ध्वजारोहण, दीपप्रज्वलन व पुष्पहार अर्पण झाल्यानंतर बौद्ध उपासक आयु. सुभाष सावंत यांच्याकडून धम्मसंस्कार पार पडला. सावर्डे विभागाचे सरचिटणीस आयु, संतोष पवार यांनी प्रास्ताविक केले. आपल्या ओघवत्या शैलीत खेरशेत शाखेचे माजी सरचिटणीस मिलिंद कदम यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. अभिजीत संजय कदम याने स्वलिखित बुद्ध धम्मावर कविता वाचन केले.
यावेळी संस्थेचे मुंबई मुख्य कमिटी कार्याध्यक्ष शांताराम गमरे, खजिनदार राहुल पवार, तालुका कमिटी सहचिटणीस प्रमोद, धमकमिटी अध्यक्ष मनोहर कदम, राजहंस पतसंस्थेचे व्हाईस चेअरमन जगदीश कांबळे, खजिनदार संतोष सावंत, न्यायदान कमिटी अध्यक्ष आनंदा सकपाळ, आरपीआयचे (आठवले) तालुकाध्यक्ष प्रशांत मोहिते, सचिव उमेश सपकाळ, युवक जिल्हाध्यक्ष अॅड. प्रशितोष कदम, नाना सावंत, खेड तालुका बौद्ध समाज सेवा संघाचे बाळाराम हळदे, सावर्डे विभागाचे मुंबई अध्यक्ष शरद कदम, दीपक जाधव, खेरशेत संघटनेचे स्थानिक अध्यक्ष विजय कदम, माजी अध्यक्ष सुनिल कदम धम्मभूषण विकास संघ खेरशेत मुंबईचे अध्यक्ष अनिल कदम, संज्योत कदम, दयानंद कदम, सुशांत कदम, लक्ष्मण कदम, तालुका संघटनेचे खजिनदार संतोष सावंत, खेरशेत महिला संघटनेच्या अध्यक्षा शैला कदम, विभागातील महिला पदाधिकारी सुप्रिया सावंत निर्मला जाधव, अनुश्री जाधव, सावर्डे विभागातील पदाधिकारी महेंद्र कदम, अरुण जाधव, विजय सावंत, संतोष सावंत, विलास जाधव, सतीश जाधव, संदेश जाधव, अमरदीप सुर्वे, अरुण जाधव, मंगेश कदम, संतोष पवार, रमेश पवार, संजय कदम, स्थानिक शाखेतील पदाधिकारी विनोद कदम, राहुल कदम, धर्मदास कदम, भीमदास कदम, अनिल कदम, रमेश कदम, राजाराम कासारे, दीपक कदम, राजू कासारे, निखिल कदम, तेजस कदम, स्वप्निल कदम, वैभव कदम, रोशन कदम, सुभाष कदम, ऋषिकेश कदम, प्रताप मोहिते, अनंत कदम गुरुजी, प्रदीप कदम गुरुजी, स्वराज मोहिते, खेरशेत यशोधरा महिला मंडळाच्या पदाधिकारी प्रज्ञा कदम, संगमित्रा कदम, मनाली कदम, संघरक्षता कदम, आमदार शेखर निकम यांचे स्वीय सहाय्यक राजेंद्र कदम आदी उपस्थित होते.










