घेरारसाळगड ओझरवाडी जवळील ओढ्यात चार वासरे वाहून गेली

Thumb - 13
तिघांना वाचवले

खेड(प्रतिनिधी)तालुक्यातील गांव देवघर व हुंबरी गावांच्या मध्यभागी ओझर खो-यात घेरारसाळगड गावातील ओझरवाडी वसलेली आहे फुटब्रिज अभावी २ जुलै रोजी या ओढ्यात चार लहान वासरे वाहून गेली त्यातील तिघांना वाचवण्यात आले

२ जुलै रोजी सायंकाळी या परिसरात मोठ्या प्रमाणात पाऊस पडत असताना सायंकाळी स्थानिक ग्रामस्थ बबन पवार यांची गुरे ओढा पार करत असताना छोटी चार वासरे वाहून जाण्याचा प्रकार घडला त्यातील तीन वासरांना जीव धोक्यात घालून स्थानिक ग्रामस्थांना वाचविण्यास यश आले व एक वासरू अखेर पाण्यात वाहून गेले .

.सदर वाडी स्वातंत्र्याच्या ७८ वर्षांनंतरही रस्ता व फुटब्रिज या मुलभूत सुविधांपासून वंचित आहे.
ओझरवाडी च्या जवळून ओझर ओढा वाहत असून पावसाळ्यात या ओढ्याला मोठ्याप्रमाणात पाणी असते.यामुळे स्थानिक ग्रामस्थ व पाळीव जनावरे यांना पावसाळ्यात सदर ओढ्यातून जीव धोक्यात घालून प्रवास करावा लागतो.

मागील अनेक वर्षे घेरारसाळगड ओझरवाडीतील ग्रामस्थ स्थानिक प्रशासन व लोकप्रतिनिधी यांच्याकडे ओझर ओढ्यावर फुटब्रिज बांधणे व सदर वाडी रस्त्याने जोडण्यासाठी सातत्याने मांगणी करत आहेत परंतु या गोरगरीब जनतेच्या मुलभूत मागण्यांकडे स्थानिक प्रशासन व लोकप्रतिनिधी यांचे दुर्लक्ष होताना दिसत आहे.
मायबाप सरकार अजून आमचे किती बळी घेणार असा संतप्त सवाल ओझरवाडीतील ग्रामस्थ विचारू लागले आहेत.