पोलीस अधीक्षकांनी निवृत्त सहकार्याना शुभेच्छा देताना केली कार्याची प्रशंसा

रत्नागिरी ः प्रतिनिधी
पोलिस दलातून वयोमानानुसार सेवा निवृत्त झालेल्या उपविभागीय पोलिस अधिकारी यशवंत केडगे नेमणूक लांजा उपविभाग, श्रेणी पोलिस उपनिरीक्षक सुधीर कदम खेड पोलिस ठाणे,पोलिस उपनिरीक्षक दिपक पवार पोलिस मुख्यालय रत्नागिरी,पोलिस उपनिरीक्षक विजय कदम मोटार परिवहन विभाग रत्नागिरी आणि पोलिस उपनिरीक्षक मिलिंद चव्हाण दापोली पोलिस ठाणे या 5 पोलिस अधिकार्‍यांचा ‘सेवानिवृत्ती कार्यक्रम’ सोमवार 30 जून रोजी उत्साहात संपन्न झाला.
यावेळी पोलिस अधिक्षक नितीन बगाटे यांनी सेवा निवृत्त होणार्‍या सर्व पोलिस अधिकार्‍यांनी सेवा कालावधीत केलेल्या कामकाजाची माहिती घेउन त्यांची प्रशंसा केली. तसेच त्यांना शाल व श्रीफळ देउन पुढील वाटचालीस शुभेच्छा आणि उर्वरित आयुष्य हे आनंदी व निरोगी जावे यासाठीदेखील शुभेच्छा देउन त्यांना व त्यांच्या कुटुंबियांना भेटवस्तू देउन सन्मानित केले.
या कार्यक्रमाला अपर पोलिस अधिक्षक जयश्री गायकवाड, पोलिस उपअधिक्षक राधिका फडके,उपविभागीय पोलिस अधिकारी निलेश माईनकर,पोलिस उपअधिक्षक शिवप्रसाद पारवे,पोलिस निरीक्षक नितीन ढेरे,सहाय्यक पोलिस निरीक्षक युवराज सुर्यवंशी तसेच निवृत्त होणारे सर्व पोलिस अधिकार्‍यांचे कुटुंबिय, पोलिस अधिकारी,अंमलदार तसेत्र मंत्रालयीन कर्मचारी उपस्थित होते.