सवेणी ग्रामपंचायत सरपंचपदी सौ. अक्षता अरविंद सागवेकर बिनविरोध !

 

खेड (प्रतिनिधी) : – तालुक्यातील सवेणी ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी अक्षता अरविंद सागवेकर तर उपसरपंचपदी अपर्णा महाडिक यांची बिनविरोध निवड करण्यात आली. या निवडीबद्दल ग्रामस्थांच्यावतीने त्यांचा सत्कार करण्यात आला. गावच्या सर्वांगीण विकासाला चालना देण्यासाठी कटिबद्ध राहण्याची ग्वाही नूतन सरपंच सौ. सागवेकर यांनी दिली.

तत्कालीन सरपंच मीना मंगेश सावरटकर यांच्यावर अविश्वास ठराव दाखल करण्यात आला होता. हा ठराव तहसीलदारांनी मंजूर केल्यानंतर मीना सावंत सावरटकर यांनी या निर्णयाविरोधात जिल्हाधिकाऱ्यांकडे अर्ज सादर केला होता. मात्र त्यांनी हा अर्ज मागे घेतल्यानंतर सरपंचपदासाठी पोटनिवडणूक लागली., आणि या पोटनिवडणुकीत सौ. अक्षता अरविंद सागवेकर यांची बिनविरोध निवड झाल्याचे घोषित करण्यात आले आहे. नवनिर्वाचित सरपंच सौ. सागवेकर यांचे अभिनंदन करून शुभेच्छा देण्यात आल्या त्यावेळी युवासेना जिल्हा सचिव श्री. राकेश सागवेकर, उपसरपंच श्रीमती अपर्णा महाडिक,माजी सरपंच मुखत्यार कावलेकर,उमेश देवरुखकर, सौ. मीना सावरटकर, माजी उपसरपंच श्री. राजेंद्र गुजर, ग्रा.पं.सदस्य सुरेश घाडगे,सौ.शिंदे, युवराज गुजर,विजय निकम,प्रदीप घाणेकर आदी उपस्थित होते