गौरव पोंक्षे l माखजन : संगमेश्वर तालुक्यातील माखजन मराठी शाळेमध्ये आषाढी एकादशी निमित्त दिंडी काढण्यात आली.दिंडी नुसती शाळेपूर्ती मर्यादित न काढता शाळेतील शिक्षक विद्यार्थ्यांना पारंपरिक वेशभूषेत,विठुरायाच्या गजरात विठोबा मंदिरात घेऊन गेले.
मराठी शाळांची दिवसेंदिवस घटत असलेली विद्यार्थी संख्या,पाहता सध्या माखजन मराठी शाळेकडून होत असलेल्या नवोपक्रमांमुळे माखजन गावात शाळेच्या शिक्षकांचं व एकूणच शाळा व्यवस्थापनाचे कौतुक होत आहे.
माखजन मराठी शाळा ते विठोबा मंदिर अशी पायी दिंडी काढून ,विठोबा मंदिरात विद्यार्थ्यांनी विठूनामाचा गजर केला.फुगड्या घातल्या.पारंपरिक वेशभूषेत नटून,थटून दिंडी मध्ये सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांना पाहण्यासाठी ग्रामस्थांनी गर्दी केली होती.
शाळेमध्ये खऱ्या अर्थाने अध्यापनासोबत संस्कृतीचे संस्कार करणाऱ्या शिक्षकांचे उपस्थितांनी कौतुक केले.दरम्यान यावेळी केंद्र प्रमुख दत्ताराम गोताड, मुख्याध्यापिका सौ कल्पना नांदिवडेकर,शिक्षक मितेश पळे, सुप्रिया जाधव, रवींद्र घाणेकर, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्षा सौ शामल सागवेकर,उपाध्यक्ष बाबू धामणाक,सौ तांबे ,सौ चव्हाण ,पालक मनस्वी रांजणे, स्नेहा जड्यार , जोगले, समृद्धी चाळके ,श्री मोरे, यावेळी अंगणवाडी चे विद्यार्थी व शिक्षक उपस्थित होते.












