आषाढी निमित्त माखजनातील विठोबा मंदिरात भाविकांची गर्दी

गौरव पोंक्षे l माखजन:    संगमेश्वर तालुक्यातील माखजन येथील विठोबा मंदिरात आषाढी एकादशी निमित्त भाविकांनी विठोबा रखुमाई चे दर्शन घेतले.

माखजन परिसरातील हे जुने मंदिर असून,आषाढी एकादशीला भाविक मोठ्या संख्येये हजेरी लावतात.बाजूलाच मोठे तळे असून याठिकाणी अनेक तरुणवर्ग पोहण्याचा आनंद लुटत असतात.