माखजन इंग्लिश मिडीयम स्कूल येथे गुरुपौर्णिमा साजरी

गौरव पोंक्षे l माखजन :    संगमेश्वर तालुक्यातील माखजन पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळाच्या माखजन इंग्लिश मिडीयम स्कूल मध्ये गुरुपौर्णिमा साजरी करण्यात आली.

यावेळी विद्यार्थ्यांनी गुरुंप्रती कृतज्ञता व्यक्ती केली.विद्यार्थ्यांनी गुरु शिष्याची महती सांगणारी मनोगते व्यक्त केली.यावेळी गुरुविषयी महती सांगणारी अनेक गाणी विद्यार्थ्यांनी सादर केली.

दरम्यान यावेळी इंग्लिश मिडीयम च्या स्कूल कमिटी अध्यक्ष दीपक शिगवण यांनी आपले मनोगत व्यक्त केले.

यावेळी संस्था अध्यक्ष किशोर साठे,उपाध्यक्ष शशिकांत घाणेकर,सुभाष सहस्त्रबुद्धे,मुख्याध्यापिका धनश्री राजेसावंत भोसले व शिक्षक,विद्यार्थी,पालक उपस्थित होते.