खेड (प्रतिनिधी) – आज रविवार, दिनांक ६ जुलै २०२५ रोजी आषाढी एकादशीनिमित्त महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने खेड एस.टी. स्टँड समोर साबुदाणा खिचडीचे वाटप करण्यात आले. सालाबादप्रमाणे यंदाही मनसेकडून भक्तांना आणि नागरिकांना खिचडी वाटपाचे आयोजन करण्यात आले होते.
या उपक्रमात मनसेचे अनेक पदाधिकारी, कार्यकर्ते आणि मान्यवर उपस्थित होते. मुख्य प्रवक्ते सन्मा. श्री. प्रकाशजी महाजन, महाराष्ट्र राज्य सरचिटणीस तथा नगराध्यक्ष अँड. वैभव खेडेकर, तालुका अध्यक्ष निलेश बामणे, मा. नगरसेवक शरद शिर्के, मनविसे जिल्हाध्यक्ष तथा पतसंस्थेचे उपाध्यक्ष भालचंद्र उर्फ नंदु साळवी, तालुका अध्यक्ष गणेश बेलोसे, मुख्य कार्यकारी अधिकारी वसंत पिंपळकर, अँड. संभाजी देवकाते, अँड. मिलींद उर्फ दादु नांदगांवकर, राहुल पाटणे, राधेश्याम वर्मा, निलेश ओतारी, राजेश भोसले, रिक्षा सेना जिल्हाध्यक्ष सिकंदर बांगी, मा. जिल्हा परिषद उपाध्यक्ष मधुकर शिरगांवकर, मा. नगरसेवक राजेश संसारे, सुनिल बुटाला, प्रसिद्धी प्रमुख सर्वेश पवार, श्वेत चोगले आदींची उपस्थिती लाभली.

या उपक्रमातून मनसेने सामाजिक बांधिलकी जपत श्रद्धाळूंना आषाढी एकादशीच्या दिवशी उपवासासाठी गरजू आणि उपासक नागरिकांना उपयुक्त असा खाद्यपदार्थ उपलब्ध करून दिला. उपस्थित मान्यवरांनी मनसेच्या या उपक्रमाचे कौतुक केले.











