खेड (प्रतिनिधी) –
संत परंपरेने नेहमीच ज्ञानाची आणि आरोग्याची महती सांगितली आहे. याच पार्श्वभूमीवर आणि आषाढी एकादशीच्या पुण्यदिनी दिनांक ६ जुलै २०२५ रोजी भरणे (ता. खेड) येथील वारकरी संप्रदाय मठामध्ये महाआरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले.
शिवसेना नेते व राज्याचे पर्यावरण मंत्री मा. श्री. रामदासभाई कदम आणि शिवसेना रत्नागिरी जिल्हाप्रमुख मा. अॅड. शशिकांतजी चव्हाण यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित या शिबिरात खेड तालुका शिवसेना, युवासेना, महिला आघाडी, युवतीसेना, जेसीआय खेड, लायन्स क्लब ऑफ खेड सिटी, बाई रतनबाई घरडा हॉस्पिटल, योगिता डेंटल कॉलेज खेड, यश मल्टीस्पेशालिस्ट हॉस्पिटल यांनी सहभाग घेतला.या कार्यक्रमाचा शुभारंभ शिवसेना उपनेते व दापोली विधानसभा मतदारसंघाचे आमदार मा. श्री. संजय कदम यांच्या हस्ते, तर रत्नागिरी जिल्हा परिषदेचे बांधकाम व आरोग्य सभापती श्री. चंद्रकांत उर्फ अण्णा कदम यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला.

या कार्यक्रमाचे आयोजन कुणबी समाजोन्नती संघाचे माजी अध्यक्ष श्री. अमित कदम यांच्या संकल्पनेतून करण्यात आले होते. या कार्यक्रमावेळी जिल्हाप्रमुख अॅड. शशिकांत चव्हाण, तालुकाप्रमुख श्री. सचिन धाडवे, उपजिल्हा संघटिका श्रीमती सुप्रिया पवार, युवासेना तालुकाप्रमुख श्री. मिलिंद काते, खेड शहरप्रमुख श्री. कुंदन सातपुते, भरणे विभागप्रमुख श्री. दिलीप राणे, ह.भ.प. येसरे महाराज, जेसी अध्यक्ष अमर दळवी, लायन्स अध्यक्ष सुरेश चिकणे, अनिल मोरे, नगरसेवक अकुंश विचारे, सरपंच संतोष गोवळकर, ग्रामपंचायत सदस्य संतोष नलावडे, नंदेश खेडेकर तसेच विविध संघटनांचे पदाधिकारी, शिवसेना व अंगीकृत संघटनांचे कार्यकर्ते आणि भक्तगण मोठ्या संख्येने उपस्थित होते. या महाआरोग्य शिबिरात सुमारे २०० वारकरी व नागरिकांनी आरोग्य तपासण्या आणि उपचारांचा लाभ घेतला.










