कृषि अभियांत्रिकी आणि तंत्रज्ञान महाविद्यालयाचा 26 वा वर्धापन दिन उत्साहात साजरा.

दापोली l प्रतिनिधी: कोकणातील डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाच्या अंतर्गत येणाऱ्या कृषि अभियांत्रिकी आणि तंत्रज्ञान महाविद्यालयाचा 26 वा वर्धापन दिन नुकताच साजरा करण्यात आला. सन 1999 साली मध्ये कृषि अभियांत्रिकी आणि तंत्रज्ञान महाविद्यालयाची स्थापना करण्यात आली. या स्थापनेमध्ये कै. अशोक पवार यांचा मोलाचा वाटा होता. या वर्धापन दिनानिमित्त विद्यालयात विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

 

याप्रसंगी व्यासपीठावर विद्यापीठाचे शिक्षण संचालक डॉ. सतीश नारखेडे, संशोधन संचालक डॉ. प्रशांत शहारे, विस्तार शिक्षण संचालक डॉ. मकरंद जोशी, डॉ. एस.व्ही. सावर्डेकर, कुलसचिव, सौ. अपर्णा जोईस, नियंत्रक डॉ. बासाकोकृवि, दापोली, कृषी अभियांत्रिकी आणि तंत्रज्ञान महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. अतुल मोहोड, कार्यकारी परिषद सदस्य सुनिल दळवी आदी मान्यवर उपस्थित होते.

 

या सोहळ्यात गेल्या 26 वर्षातील महाविद्यालयाच्या वाटचालीतील गत स्मृतिना उजाळा डॉ. पुनम चव्हाण यांनी केला. आलेल्या सर्व मान्यवरांनी महाविद्यालयाच्या वाटचालीत आतापर्यंत ज्या अधिकारी, कर्मचारी आणि विद्यार्थी यांनी योगदान दिले त्यांचे स्मरण करून सर्वाना धन्यवाद दिले आणि विद्यार्थ्यांनी आपले चारित्र्य चांगले राखून सर्वानी महाविद्यालयाच्या पुढील वाटचालीत संपूर्ण योगदान द्यावे आणि सहकार्य करावे असे आवाहन केले. विद्यापीठाचे शिक्षण संचालक यांनी नारखेडे -उत्तरोत्तर भरभराट व्हावी यासाठी शुभेच्छा दिल्या,

संशोधन संचालक यांनी कृषि क्षेत्रातील अडचणीवर कृषि अभियांत्रिकी शाखेने केलेली मात यावर प्रकाश टाकला तर

विस्तार शिक्षण संचालक यांनी कोकणात कृषि अभियांत्रिकीचे महत्व सांगितले.विद्यापीठाचे कुलसचिव यांनी महाविद्यालयाच्या प्रगतीच्या चढत्या आलेखाबाबत कौतूक व्यक्त केले आणि पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

 

मान्यवरांचे आणि उपस्थितांचे स्वागत डॉ. ए. जी. मोहोड- सहयोगी अधिष्ठाता, डॉ. के. जी. धांदे – विभाग प्रमुख – कृषि यंत्रे व शक्ति, डॉ. एस. के. जैन – विभाग प्रमुख, प्रक्षेत्र संरचना, डॉ पी. एम. इंगळे – विभाग प्रमुख – सिंचन व निचरा विभाग आणि डॉ. बी. एल.आयरे – मृदा व जल संधारण विभाग यांनी केले.

 

प्रास्ताविक प्रा.मयुरेश पाटिल तर आभार प्रदर्शन डॉ. अभिमान सावंत यांनी केले.

 

कार्यक्रमाला महाविद्यालयातील प्राध्यापक, कर्मचारी आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. सदर कार्यक्रम सहयोगी अधिष्ठाता डॉ. अतुल मोहोड यांच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात आला. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सर्व विभाग प्रमुख, प्राध्यापक, सहाय्यक कुलसचिव श्री अनिल मरकड तसेच सहयोगी अधिष्ठाता कार्यालयातील सर्व अधिकारी, कर्मचारी आणि विद्यार्थी यांनी विशेष परिश्रम घेतले.