तालुक्यातील ६० ग्रा.पं. घ्या सरपंच पदाची फेर आरक्षण सोडत १४ जुलै रोजी 

लांजा (प्रतिनिधी) तालुक्यातील एकूण ६० ग्रामपंचायतींच्या सरपंच पदाचे फेर आरक्षण सोडत काढण्यासाठी सोमवारी १४ जुलै रोजी रोजी सकाळी ११ वाजता लांजा तहसिलदार कार्यालय सभागृहात विशेष सभा आयोजित करण्यात आली आहे .

सन २०२५ ते २०३० या कालावधीत मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुका झाल्यानंतर सरपंच पद कोणत्या प्रवर्गासाठी आरक्षित असेल हे निश्चित करण्यासाठी तालुक्यातील एकूण ६० ग्रामपंचायतीचे सरपंच पदाच्या आरक्षण सोमवार दि. १४ जुलै रोजी सकाळी ११ वाजता काढण्यात येणार आहे .

त्यासाठी विशेष सभेचे आयोजन करण्यात आले असून या सरपंच पदाचे आरक्षण सोडत विशेष सभेसाठी उपस्थित राहण्याचे आवाहन तहसीलदार प्रियांका ढोले यांनी केले आहे.