करुळ येथे वृक्षारोपण व वृक्ष दिंडीचे आयोजन 

वैभववाडी l प्रतिनिधी :कृषी महाविद्यालय सांगुळवाडीच्या वतीने करुळ येथे रानभाज्याचे प्रदर्शन, वृक्षारोपण वृक्ष दिंडी आयोजित करण्यात आली होती. यावेळी कृषीकन्यांनी आधुनिक पद्धतीने करण्यात येणाऱ्या शेतीबाबत शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले.

यावेळी गटविकास अधिकारी रामचंद्र जंगले, पोलीस निरीक्षक मनोज सोनवलकर, उपविभागीय कृषी अधिकारी उमाकांत पाटील, तालुका कृषी अधिकारी निरंजन देशमुख, जिल्हा बँक माजी संचालक दिगंबर पाटील, करुळ सरपंच नरेंद्र कोलते, प्रा. विवेक कदम, प्रकाश सावंत, हेमंत पाटील, श्री हुले, श्री मंदावाड, पोलीस पाटील उदय कदम, सचिन पाटील, कृषी सहाय्यक समीर कदम, राहुल शेळके, मुख्याध्यापक श्री घाडगे सर, कृषीकन्या वैभवी शेळके, उत्कर्षा चांडवले, तेजल मोहिते, अनुजा कवडे, अनघा बरकडे, अरुंधती पवार, पर्णवी पाटील, अक्षता खाडये आदी उपस्थित होत्या. या कृषी कन्यांना प्राचार्य डॉ. स्वप्निल होळकर, प्रा. विवेक कदम, प्रा. प्रियांका मेस्त्री यांचे मार्गदर्शन लाभले.