पोषण आहाराच्या खिचडीची पॅकेट चक्क कचर्‍यामध्ये  शासनाने दिलेला पोषण आहार नक्की कशासाठी?

गुहागर l प्रतिनिधी – महाराष्ट्र शासन बालकांना पोषण आहार शाळांमध्ये पुरवण्याचे काम करतं आहे. मात्र त्याची मुदत पूर्ण होण्याआधीच शासनाच्या ह्या पोषणा आहार खिचडीची पॅकेट कचर्‍याच्या ढिगार्‍यामध्ये आढळून आल्याची घटना घडली असून, याची सखोल चौकशी करण्यात यावी. अन्यथा महाराष्ट्र नवनिर्माण सेना आक्रमक भूमिका घेणार असल्याची माहिती महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उपजिल्हाध्यक्ष विनोद जानवळकर यांनी दिली.

पोषण आहाराच्या खिचडीची ही पॅकेट गुहागर तालुक्यातील जानवळे फाटा या ठिकाणी रस्त्यालगत असणार्‍या कचर्‍यामध्ये टाकल्याचे महाराष्ट्र नवनिर्माण सेना उपजिल्हाध्यक्ष विनोद जानवळकर यांच्या लक्षात आल्याने त्यांनी तात्काळ आक्रमक भूमिका घेऊन हा पोषण आहार कोणत्या शाळेचा आहे की, अंगणवाडीचा आहे याची शासनाने तात्काळ चौकशी करून याच्यावरती कडक कारवाई करावी. अन्यथा महाराष्ट्र नवनिर्माण सेना आक्रमक भूमिका घेणार असल्याची माहिती विनोद जानवळकर यांनी दिली.