वैभववाडीत शत प्रतिशत भाजपा : सर्व जागांवर भाजपाचा दणदणीत विजय

विजयानंतर भाजपा कार्यकर्त्यांचा मोठा जल्लोष

पालकमंत्री नितेश राणे यांच्याकडून विजयी उमेदावारांचे अभिनंदन

 वैभववाडी l प्रतिनिधी :     पार पडलेल्या जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूकीत सर्व जागा भारतीय जनता पक्षाने जिंकत मोठा विजय मिळवला आहे. जिल्हा परिषदच्या 3 जागा व पंचायत समितीच्या 6 जागा भारतीय जनता पार्टीने निर्विवाद जिंकल्या आहेत. सर्व विजयी उमेदवारांचे जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांनी अभिनंदन केले आहे.

कोकिसरे जिल्हा परिषद मतदार संघातून भाजपाच्या श्रावणी रोहन रावराणे या 4138 मतांनी विजयी झाल्या आहेत. लोरे जिल्हा परिषद मतदारसंघात भाजपाच्या रिद्धी रितेश सुतार 4040 मतांनी विजयी झाल्या आहेत.

भुईबावडा पंचायत समितीमध्ये भाजपचे देवानंद पालांडे 2047 मतांनी विजयी, कोळपे पंचायत समिती मतदारसंघात भाजपाच्या सुवर्णा महेश संसारे 2041 मतांनी विजयी, उंबर्डे पंचायत समिती मतदारसंघात भाजपच्या साची सचिन कोलते 1917 मतांनी विजयी, खांबाळे पंचायत समिती मतदारसंघात भाजपचे मंगेश तुकाराम लोके 1940 मतांनी विजयी, लोरे पंचायत समिती मतदारसंघात भाजपचे सिद्देश दिलीप रावराणे 2051 मतानी विजयी झाले आहेत.

तर कोळपे जिल्हा परिषद मतदार संघात भाजपचे प्रमोद पुंडलिक रावराणे हे बिनविरोध निवडून आले आहेत. कोकिसरे पंचायत समिती मतदारसंघात साधना सुधीर नकाशे या बिनविरोध निवडून आल्या आहेत.

विजयानंतर वैभववाडी तालुक्यात भाजपा कार्यकर्त्यांनी डीजेच्या तालावर व गुलालाची उधळण करत मोठा जल्लोष केला.