वेंगुर्ले : प्रतिनिधी
उभादांडा न्यू इंग्लिश स्कूल मधील विद्यार्थ्यांनी शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये चांगले यश प्राप्त केले आहे. वेंगुर्ले तालुक्यात शिष्यवृत्ती प्राप्त अनुक्रमे पहिले एक ते चार क्रमांक याच शाळेने प्राप्त केल्याने यशस्वी विद्यार्थ्यांचे आणि हायस्कूल चे सर्वत्र अभिनंदन होत आहे.
शिष्यवृत्ती परीक्षा २०२५ मधील इयत्ता आठवी ची गुणवत्ता यादी जाहीर झालेली आहे. यामध्ये उभादांडा न्यू इंग्लिश स्कूल मधील कु. प्राजक्ता अनिल भोकरे (ग्रामीण सर्वसाधारण गट जिल्हा गुणवत्ता यादी २ रा क्रमांक), कु. ईशा सुधर्म गिरप (ग्रामीण सर्वसाधारण गट जिल्हा गुणवत्ता यादी २४ वा क्रमांक), कु.मयंक मोहन नंदगडकर (ग्रामीण सर्वसाधारण गट जिल्हा गुणवत्ता यादी २७ वा क्रमांक) आणि कु. प्रतिक प्रदिप नाईक (ग्रामीण सर्वसाधारण गट जिल्हा गुणवत्ता यादी २९ वा क्रमांक) प्राप्त केला आहे. हे विद्यार्थी शिष्यवृत्तीसाठी पात्र ठरलेले आहेत.
तर कु. श्रावणी विजय नार्वेकर ही उत्तीर्ण झालेली आहे. सर्व शिष्यवृत्तीधारक, उत्तीर्ण विद्यार्थी, त्यांचे पालक आणि त्यांना मार्गदर्शन करणारे श्री. उमेश वाळवेकर, सौ. भिसे मॅडम, सौ. मोहिते मॅडम, सौ.कुबल मॅडम, श्री.अजित केरकर सर, श्री. दिपक बोडेकर, सौ.विद्या परुळेकर या सर्वांचे विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री. उमेश वाळवेकर, संस्था चेअरमन श्री. विरेंद्र कामत आडारकर, संस्था सचिव श्री .रमेश नरसुले, संस्था उपाध्यक्ष श्री .रमेश पिंगुळकर, पालक शिक्षक संघ, शाळा व्यवस्थापन समिति यांनी अभिनंदन केले आहे.











