माटणेत राहत्या घरात सकाळीच चोरी!

घरातून बाहेर गेल्यावर चोरी

दोडामार्ग : सुहास देसाई
महाराष्ट्र व गोवा राज्याच्या सीमेवर असलेल्या तालुक्यातील माटणे वरचीवाडी येथील cश्रीकांत धानू गवस यांचे घर अज्ञात चोरट्यानी फोडून दीड लाखाच्या दागिन्यास दहा हजार रोख रक्कम लंपास केली आहे. याबाबत दोडामार्ग पोलिसांत तक्रार दाखल करताच पोलिसांनी घटना स्थळी जाऊन पंचनामा केला. व अधिक तपास पोलिस करत आहे

सविस्तर वृत्त असे की, माटणे वरची वाडी येथील श्रीकांत गवस नियमित प्रमाणे मुलांना शाळेत सोडण्यासाठी सकाळी गेले. त्यांची पत्नी घर बंद करून आपल्या काजू बागेत गेली. घर बंद असल्याचा फायदा घेत अज्ञात चोरट्यानी घराचे कुलुप फोडले व आतून दाराला खिळी घातली व रूमधील कपात फोडून कपाटातील दोन चेन, दोन अंगठी, कानातील असे साधारण दीड लाखाहून अधिक किमतीचे दागिने व रोख रक्कम लंपास केली असल्याचे सांगण्यात आले

श्रीकांत यांची पत्नीने गळ्यातील मंगळसूत्र दुसऱ्या ठिकाणी ठेवले असल्याने ते चोरट्याच्या हाती लागले नाही. मिळाले दागिने व रोख रक्कम घेऊन चोरट्यानी पळ काढला. श्रीकांत गवस हे आपल्या मुलांना शाळेत सोडून घरी आले असता घराच्या दरवाज्याचे कुलूप फोडल्याचे त्यांना लक्षात आले. यावेळी त्यांनी घराचा दरवाजा ढकलून पाहिला असता दरवाजाला आत मधून खिळी घातल्याचे त्यांच्या लक्षात येताच त्यांनी घराच्या मागच्या बाजूने घरात गेले व घरातील सर्व सामाना कपाटातील सामान आस्थावेस्ता पडल्याचे निदर्शनास आले. यावेळी कोणीतरी चोरी केल्याचे त्यांना समजताच त्यांनी या घटनेची दोडामार्ग पोलिसांना कल्पना देऊन तक्रार दाखल केली. या नंतर दोडामार्ग पोलीस निरीक्षक हेमचंद्र खोपडे, व पोलीस मळगावकर यांनी घटना स्थळी जाऊन पंचनामा केला. अधिक तपास दोडामार्ग पोलीस करत आहेत.