साळशी हायस्कूलमध्ये गुणवंतांचा सन्मान सोहळा

गुणवंत विद्यार्थ्यांच्या हस्ते नूतन प्रसाधनगृहाचे उद्घाटन

शिरगाव (प्रतिनिधी) –    देवगड तालुक्यातील माध्यमिक विद्यामंदिर साळशी या प्रशाळेतील एस.एस.सी. मार्च २०२५ परीक्षेत उज्वल यश मिळवणाऱ्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा, तसेच नूतन प्रसाधनगृहाच्या उद्घाटनाचा कार्यक्रम उत्साहात पार पडला.

या प्रशळेतील केतकी साळसकर ( प्रथम क्रमांक), मदार साळसकर व सोहम नाईक( । द्वितीय क्रमांक), आणि दिव्या गावकर (तृतीय क्रमांक )यांचा उपस्थित मान्यवरांच्या हस्ते रोख रक्कम, प्रशस्तीपत्र, सन्मानचिन्ह व गुलाबपुष्प देऊन गौरव करण्यात आला.

तसेच या कार्यक्रमाचा विशेष भाग ठरला तो नव्याने बांधण्यात आलेल्या प्रसाधनगृहाचे उद्घाटन गुणवंत विद्यार्थ्यांच्या हस्ते, पालक, विद्यार्थी व मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडले.

तसेच, यावेळी इयत्ता ८ वीमध्ये नव्याने प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांना गणवेशांचे वाटप पालक व मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.

यावेळी प्रमुख मार्गदर्शक म्हणून संस्था अध्यक्ष श्री. सत्यवान सावंत, स्कूल कमिटीचे चेअरमन श्री. सत्यवान भोगले, तसेच मुख्याध्यापक श्री. माणिक वंजारे यांनी विद्यार्थ्यांना प्रेरणादायी विचार व्यक्त केले व त्यांच्या यशाचे मनःपूर्वक कौतुक केले.

या कार्यक्रमास संस्था सदस्य, स्कूल कमिटी सदस्य, पालक, विद्यार्थी, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री. पुरुषोत्तम साटम सर यांनी केले, तर आभारप्रदर्शन श्री. स्वप्निल भरणकर सर यांनी केले.

फोटो कॅप्शन: साळशी हायस्कुलमधील गुणवंत विध्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला.