रत्नागिरी जिल्ह्यात आज सरासरी २०.१४ मिमी पावसाची नोंद!

रत्नागिरी : आज, सोमवार, १४ जुलै २०२५ रोजी सकाळी ८ वाजता संपलेल्या २४ तासांत रत्नागिरी जिल्ह्यात एकूण १८१.३४ मिमी पावसाची नोंद झाली आहे. जिल्ह्याचा आजचा सरासरी पाऊस २०.१४ मिमी इतका राहिला.
तालुकानिहाय पावसाची आकडेवारी पुढीलप्रमाणे:
* मंडणगड: १७.२५ मिमी
* खेड: ३२.२८ मिमी
* दापोली: २०.१४ मिमी
* चिपळूण: २८.०० मिमी
* गुहागर: ११.४० मिमी
* संगमेश्वर: २०.५० मिमी
* रत्नागिरी: १५.७७ मिमी
* लांजा: २६.०० मिमी
* राजापूर: १०.०० मिमी
आज खेड तालुक्यात सर्वाधिक ३२.२८ मिमी पावसाची नोंद झाली, तर राजापूर तालुक्यात सर्वात कमी १०.०० मिमी पाऊस पडला. या पावसामुळे बळीराजा सुखावला असून, शेतीच्या कामांना गती येणार आहे.