महात्मा गांधी विद्यामंदिर शाळा सातार्डा नंबर १ चा उपक्रम
सावंतवाडी : प्रतिनिधी
लहान मुलांना विद्यार्थी दशेतच शेतीची माहिती मिळावी या उद्देशाने शासनाकडून बांधावरची शाळा हा उपक्रम राबवला जातो. या पार्श्वभूमीवर महात्मा गांधी विद्यामंदिर शाळा सातार्डा नंबर १ या शाळेतील चिमुकल्या विद्यार्थ्यांनीही प्रत्यक्ष शेतात उतरत भात लावणीचा आनंद लुटला. तसेच शेतकऱ्याच्या कामाची माहिती घेतली.
सातार्डा नंबर १ या शाळेतील पहिली ते सातवीतील ३५ चिमुकल्या विद्यार्थ्यांनी भात शेतीचे धडे गिरवले. तरवा काढणे, चिखलणी करणे हे अनुभवले. सातार्डा देऊळवाडी येथील दाजी कोरगावकर यांच्या शेतात हा उपक्रम राबविण्यात आला. यावेळी विद्यार्थ्यांसह मुख्याध्यापक दासू गावित सर, वेंगुर्लेकर मॅडम, जाधव सर, यापाडे सर सहभागी झाले होते.











