रत्नागिरी. एज्युकेशन सोसायटीच्या सौ. गोदूताई जांभेकर विद्यालय, रत्नागिरी या प्रशालेत आज गुरुवार दिनांक 10 जुलै 2025 रोजी दरवर्षी प्रमाणे या वर्षी देखील गुरुपौर्णिमा उत्साहात साजरे करण्यात आली. मानवी जीवनातील गुरुचे स्थान लक्षात घेऊन या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
गुरुपौर्णिमा कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रशालेच्या प्र. मुख्याध्यापिका संजना तारी उपस्थित होत्या तर आजच्या कार्यक्रमाच्या प्रमुख वक्त्या सहाय्यक शिक्षिका स्नेहल पावरी होत्या. कार्यक्रमाची सुरुवात सरस्वतीच्या व संस्थेचे संस्थापक बाबुराव जोशी व मालतीबाई जोशी यांच्या प्रतिमांच्या दीप प्रज्वलनाने करण्यात आली. प्रथम वर्ग प्रतिनिधींनी प्रशालेतील शिक्षकांचा गुलाबपुष्प व छोटीशी भेट देऊन सन्मान केला व प्रशालेच्या विद्यार्थिनींनी मधुर आवाजातील गुरुवंदना गीत सादर केले. गुरुपौर्णिमा निमित्त प्रशालेतील विद्यार्थ्यांनी गुरूंचे महत्त्व आपल्या भाषणामध्ये सांगितले यामध्ये युवराज कारकर, नमिता सागवेकर, राजवीर कापडे ,श्रेया भातडे यांनी गुरूंचा महिमा सांगितला.
आजच्या कार्यक्रमाच्या प्रमुख वक्त्या स्नेहल पावरी यांनी गुरुपौर्णिमेचे महत्त्व सांगितले. स्नेहल पावरी यांनी आषाढ महिन्यातील पौर्णिमेला गुरुपौर्णिमा म्हणतो. या दिवशी गुरूंची पूजा केली जाते. संपूर्ण देशात हा सण श्रद्धेने आणि आनंदाने साजरा केला जातो तसेच प्रत्येकाच्या आयुष्यात पहिला गुरु हा त्याचे आई असते. त्यानंतर विविध गुरु त्यांच्या आयुष्यात येतात. शिक्षकांच्या आणि पालकांच्या विकासात पालकांचा जेवढा वाटा असतो तेवढाच वाटा देखील शिक्षकांचा असतो असेही त्यांनी आवर्जून सांगितले.
प्रशालेच्या प्र. मुख्याध्यापिका संजना तारी यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात गुरूंचा महिमा सांगितला. अनेक गुरूंचा दाखला देऊन गुरूंचे महत्त्व सांगितले. आजच्या प्रमुख व्यक्ती स्नेहल पावरी यांचे गुलाब पुष्प देऊन आभार मानले.
कार्यक्रमाला प्रशालेतील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वर्ग प्रतिनिधी आर्यन चव्हाण यानी केले तर आभार वर्ग प्रतिनिधी वेदा मांडवकर हिने मांनले.











