माखजन आरवली परिसरात गणेशोत्सव ववसे उत्साहात साजरे

गौरव पोंक्षे माखजन

कोकणातील पारंपरिक सण-उत्सवांच्या परंपरेत महत्त्वाचे स्थान असलेला गणेशोत्सवातील ववसे उत्सव महिलांनी मोठ्या उत्साहात आणि पारंपरिक पद्धतीने साजरा केला.संगमेश्वर तालुक्यातील माखजन.आरवली परिसरात महिला वर्गाने या कार्यक्रमाचा भक्तिमय आनंद लुटला.आंबव पोंक्षे येथील धामापूर तर्फे संगमेश्वर पं.समिती सदस्या सौ प्रिया सुवरे देखील या ववसे साजरे करण्यात महिलांसोबत सक्रिय सहभागी झाल्या होत्या.
या निमित्ताने महिलांनी एकत्र येत धार्मिक विधी, पूजन तसेच विविध पारंपरिक प्रथा पार पाडल्या.
गावागावांत महिलांमध्ये उत्साहाचे वातावरण दिसून आले. सकाळपासूनच घरांची स्वच्छता करून पूजेसाठी तयारी करण्यात आली. पारंपरिक वेशभूषेत महिला उत्सवात सहभागी झाल्या. यावेळी महिलांनी एकमेकींना शुभेच्छा देत सणाचा आनंद द्विगुणित केला.
कोकणातील लोकजीवनाशी जोडलेल्या या पारंपरिक उत्सवामुळे गावांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते. बदलत्या काळातही महिलांनी जपलेली ही सांस्कृतिक परंपरा पुढील पिढीपर्यंत पोहोचविण्याचा संदेश या उत्सवातून मिळाला.