साखरपा (वार्ताहर)
नुकतीच 2024 शिष्यवृत्ती परीक्षेची गुणवत्ता यादी जाहीर झाली. त्यामध्ये पी .एस.बने इंटरनॅशनल स्कूल साडवली चा इयत्ता 9 वीत शिकणारा विध्यार्थी आरुष मृणालिनी राजीव चव्हाण याने ( CBSE Board/ICSE Board ) राज्यात 9 वा क्रमांक पटकवला. त्याच्या या यशाने सर्वत्र त्याचे कौतुक होत आहे.काही दिवसापूर्वी स्कॉलरशिप स्पर्धेचा निकाल जाहीर झाला होता व दिनांक 10 जुलै रोजी गुणवत्ता यादी जाहीर झाली. त्यामध्ये आरुष याने विशेष प्रविण्य मिळवले. या निकालात रत्नागिरी जिल्ह्यातून 4 जणांनी गुणवंत्ता यादीत स्थान मिळवले आहे. त्यामध्ये आरुष याचा सहभाग असल्याने त्याच्या पालकांनी मार्गदर्शक शिक्षकांनी आनंद व्यक्त केला.
3 महिन्यापूर्वी जाहीर झालेल्या BDS परीक्षेत आरुष याने देशात 21 वा क्रमांक मिळवत गोल्ड मेडल मिळवले.लहाणपणापासून विविध स्पर्धा परीक्षेत कायमच आपला आरुषने डंका वाजवीला असून खऱ्या अर्थाने स्कॉलर विध्यार्थी म्हणून त्याने ओळख निर्माण केली आहे.
त्याच्या या यशात त्याचे आई- वडील, मार्गदर्शक शिक्षक असल्याचे सांगितले. यापुढे देखील आपण विविध स्पर्धा परीक्षा देणार असून गुणवत्तेची ही परंपरा कायम राखणार असल्याचे सांगितले. पुर्ये हे त्याचे गाव असून साखरपा सह पंचक्रोशी मधून त्याच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.












