दोडामार्ग :-
दोडामार्ग तालुक्यातील पांडव कालीन देवस्थान साठी प्रसिद्ध असलेल्या कसईनाथ डोंगराचा एका बाजूला असलेल्या दगडी भागात मोठे दगड माती कोसळल्याची ती घटना घडली आहे काल मोठे दगड कोसळल्याने मोठा आवाज झाल्याने जंगलातील जंगली प्राणी, पक्षी याचा आवाज आल्याची माहिती स्थानिक ग्रामस्थांनी दिली होती
याबाबत सविस्तर वृत्त असे की कसईनाथ डोंगराचा गिरोडे गावाच्या दिशेंकडील काही भाग मोठ्या आवाज करत कोसळला होता त्यामुळे जंगली प्राणी माकड, मोर हे मोठमोठ्याने ओरडत होती अशी माहिती सोशल मीडियार व्हायरल झाली होती. याबाबत गिरोडे डोंगराच्या पायथ्याशी असलेल्या गिरोडे गावात जाऊन चौकशी केली असता रविवारी साधारण 6.30 वाजण्याच्या सुमारास कसईनाथ डोंगरावर वाघबीळ म्हणून प्रसिद्ध असलेल्या ठिकाणाचा काही भाग म्हणजे मोठे दगड, झाडे, माती मोठ्याने आवाज करत कोसळले या मोठ्या आवाजाने येथील मोर, माकड हे मोठ्याने ओरडत होते. असे गिरोडे गावातील ग्रामस्थांनी सांगितले. कोसळलेल्या भागामुळे कोणतेही नुकसान झाले नाही. मात्र डोंगरातील काही भाग पाण्याचा निचरा न झाल्याने डोंगर खचला असल्याचे जाणकार ग्रामस्थांनी सांगितले












